photo 
मराठवाडा

मुदतबाह्य झालेले खाद्यतेल आढळले, दहा लाखाचा मुद्देमाल जप्त...

राजेश दारव्हेकर

औंढा नागनाथ : औंढा नागनाथ येथील मे. नागेश्वर ऑईल इंडस्ट्रीज या आस्थापनेची गुरुवारी (ता.२०) तपासणी केली असता या आस्थापनेत खाद्यतेल पॅकिंग करण्यासाठी रियुज टिन वापरत असल्याचे आढळून आले. तसेच सदर आस्थापनेत मुदतबाह्य परवाना क्रमांक असलेले रिफाईड सोयाबीन ऑईल हा अन्नपदार्थ आढळून आले असून हा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

अन्न व औषध प्रशासन कार्यालय परभणी यांनी औरंगाबाद विभागाचे सह आयुक्त उ.शं.वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली व सहायक आयुक्त नारायण सरकटे यांच्या नेतृत्वात ही कारवाई झाली.

अन्नपदार्थांचा दर्जा उत्तम राखावा अन्यथा कारवाई 
रिफाईंड सोयाबीन ऑईल, रिफाइंड पामोलिन ऑईल, रिफाइंड सोयाबीन ऑईल (सोया डीलक्स ) या अन्नपदार्थांचे नमुने विश्लेषणास्तव घेण्यात येऊन उर्वरित एकूण दहा लाख ८९ हजार ११३ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून अन्न व्यावसायिकांच्या ताब्यात देण्यात आला. या मुद्देमालात रिफाईड सोयाबीन ऑईल पाच हजार लिटर, रिफाईंड पामोलिन ऑईल तीन हजार लिटर, रिफाईंड सोयाबीन ऑईल (सोया डिलक्स) २३७ टिन, रियुजड टिन एम्पटी कॅन अकराशे आदी समावेशित आहे. कायद्यातील तरतुदीचे पालन करावे व सणासुदीच्या अनुषंगे अन्नपदार्थांचा दर्जा उत्तम राखावा अन्यथा सदर कायद्याच्या अनुषंगाने कारवाई करण्यात येईल असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त नारायण सरकटे यांनी केले आहे. 

औंढा नागनाथ येथे पहिलीच कारवाई
सदरील कारवाई ही औरंगाबाद विभागाचे सह आयुक्त उ.शं. वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त नारायण सरकटे यांच्या नेतृत्वात अन्नसुरक्षा अधिकारी अनुराधा भोसले, प्रकाश कच्छवे, अरुण तमडवार, श्री.लोंढे यांनी केले. औंढा नागनाथ शहरामधील अन्न व औषध प्रशासन यांची ही पहिलीच कारवाई असून अन्न व औषध प्रशासन यांचे कार्यालय हे परभणी या ठिकाणाहून चालत असते. हिंगोली जिल्हा होऊनही या ठिकाणी अद्याप अन्न व प्रशासन कार्यालय आलेले नाही अशा पद्धतीच्या वेळोवेळी जिल्ह्यामध्ये कारवाया होणे गरजेचे आहे जेणेकरून असा व्यवसाय करणाऱ्यावर वचक निर्माण होईल, अशी चर्चा शहरात होत आहे. या कारवाईने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. असा व्यवसाय करण्यास आता कोणी धजावणार नाही अधुनमधून शहरात अशी कारवाई झालीच पाहिजे अशी देखील चर्चा ऐकायला मिळत आहे.

संपादन ः राजन मंगरुळकर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar Resigns: रुपाली चाकणकर यांचा अखेर राजीनामा! राजीनाम्याचं कारणही सांगितलं

धर्मांतर कायद्यानंतर आता UCC! महाराष्ट्रात समान नागरी संहिता लागू करणार? विवाह, वारसा, घटस्फोट नियमांमध्ये होणार बदल

Ashok Kharat: ''अजित पवारांच्या निवासस्थानाबाहेर घडलेला प्रकार गंभीर...'', आमदाराचं मुख्यमंत्र्यांना पत्र

अमरावतीत स्वच्छतेचा बोजवारा; कंत्राटदार नियुक्तीच्या प्रक्रियेला खीळ; सत्ताधाऱ्यांसह विरोधकांच्या तलवारी म्यान

Latest Marathi News Update: राज्यासह देशात आज कुठे काय घडलं? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT