school students sakal
मराठवाडा

Eyes Infection : डोळ्यांच्या साथीचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना; संसर्गामुळे घटली शाळांची पटसंख्या

आरोग्य विभाग याबाबत कुठल्याच उपाययोजना करताना दिसून येत नाही.

सकाळ डिजिटल टीम

परतूर - डोळ्यांच्या साथीने सारेच त्रस्त आहेत. याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बसत असून, मात्र, आरोग्य विभाग याबाबत कुठल्याच उपाययोजना करताना दिसून येत नाही.

डोळ्यांच्या व्हायरससाठी पावसाळा पोषक ऋतू मानला जातो. डोळ्याला संसर्ग होणे ते लक्षणे दिसण्याचा काळ हा तीन ते चार दिवसांचा असतो. औषधोपचारानंतर डोळे पूर्ववत होतात. त्यासाठी एका आठवड्याचा कालावधी लागतो. पण दुर्लक्ष केल्यास बुबुळाला संसर्ग होतो आणि परिस्थिती गंभीर होते.

सध्या विद्यार्थ्यांमध्ये डोळे येण्याच्या साथीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत चाले आहे. हा रोग संसर्गजन्य असल्याने याची लागण अनेकांना होत आहे. मात्र, आरोग्य विभाग डोळ्याची साथ आटोक्यात आणण्यासाठी कुठलेही प्रयत्न होताना दिसून येत नाही, असा नागरिकांचा आरोप आहे. दरम्यान,आजार नसतो तेव्हा शाळेत आरोग्य विभागाचे अधिकारी दौरे करतात.

विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणीही केली जाते. पण पावसाळ्यात ग्रामीण भागात साथरोगांचा प्रादुर्भाव वाढला असताना प्राथमिक आरोग्य विभागाने झोपेचे सोंग घेतले आहे. तसेच जिल्हा परिषदेचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण विभाग अनभिज्ञ असून त्यांनी शाळांना याबाबत कुठल्याही सूचना केलेल्या नसल्याचे शाळांचे म्हणणे आहे.

शिक्षण विभागाकडून लेखी सूचना नाहीत

शहरी भागासह ग्रामीण भागात बहुतांश विद्यार्थ्यांना सध्या सर्दी, खोकला, तापासह डोळ्याच्या संसर्गाचा त्रास होत आहे. हा संसर्गजन्य आजार असल्याने एकाला लागण झाल्यास इतर विद्यार्थीही बाधित होत आहेत. प्रकृती बरी नसलेल्यांनी शाळेत येऊ नये, असे आवाहन शिक्षक व मुख्याध्यापक करत आहेत. शाळा पातळीवर निर्णय घेतला जात असला तरी प्राथमिक, माध्यमिक शिक्षण विभागाकडून या संदर्भात लेखी सूचना अद्याप प्राप्त झाल्या नसल्याचे शाळांकडून सांगण्यात आले. परिणामी शिक्षक व मुख्याध्यापक अडचणीत सापडले आहेत.

डोळ्यांचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. अनेक विद्यार्थ्यांना याची बाधा झाली आहे. यामुळे शाळेत विद्यार्थ्यांची संख्या घटत आहे. आरोग्य विभाग याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे.

- सुनील खरात, मुख्याध्यापक, विवेकानंद विद्यालय,परतूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

China Nepal Border: मृत्यूचे तांडव डोळ्यांसमोर पाहतोय! प्रत्यक्षदर्शीचा अनुभव; चीन-नेपाळ सीमेवर अडकले राज्यातील ४०० भाविक

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

SCROLL FOR NEXT