file photo 
मराठवाडा

पाथरीचा चेहरामोहरा बदलणार; कसा तो वाचा ?

धनंजय देशपांडे

पाथरी (जिल्हा परभणी) ः साई मंदिर परिसर व सहा रस्त्याच्या रुंदीकरणात शहरातील ९१३ नागरिकांच्या मिळकती जाण्याची शक्यता असून. या मिळकती अधिग्रहीत करण्यासाठी शासनास ४० कोटी रुपये लागु शकतात. दरम्यान मोजणीचे काम अंतिम टप्प्यात असल्याने आता दुसऱ्या टप्प्यातील कामाची प्रतीक्षा लागली आहे.

साई जन्मभूमीचा विकास करण्याच्या दृष्टीने मंदिर परिसरातील जागा व मंदिराकडे जाणारे रस्ते रुंद करण्यासाठी लागणाऱ्या जमीनचे अधिग्रहित करन्याच्या दृष्टीने त्या भागातील जमिनींचे मोजमाप करण्याच्या कामाची सुरुवात (ता. दहा) फेब्रुवारी रोजी करण्यात आली होती. भूमिअभिलेख विभागाचे आठ व नगरपालिकेचे आठ असे एकूण सोळा कर्मचारी हे काम करीत असून मोजणीचे काम आता अंतिम टप्प्यात आहे.
दरम्यान, मंदिर परिसर विकसित करण्यासाठी तसेच मंदिराकडे जाणाऱ्या चार तसेच मेन रोड व साई रोड रुंदीकरणात ९१३ नागरिकांच्या मिळकती जाणार आहेत. यात मेन रोड वरील ४५०, साई रोडवरील १५४ तसेच इतर चार रस्त्यावरील ३०९ नागरिकांच्या मिळकतीचा समावेश आहे. या मिळकती अधिग्रहीत करण्यासाठी शासनास अंदाजे ४० कोटी रुपये लागु शकतात.

  • हेच ते सहा रस्ते (४० फुटी)
  • मेन रोड - सेंट्रल नाका ते लेंडी नाला.
  • साई रोड - राष्ट्रीय महामार्ग ते लेंडी नाला.
  • जोड कुव्वा ते खान अब्दुल गफार खान कॉलेज.
  • लतीफ खान फनगशन हॉल - चोक बाजार मार्गे अरब गल्ली - चौधरी गल्ली ते माळीवाडा.
  • मेन रोड - कुरेशी मोहल्ला ते साई रोड.
  • मंदिर ते नियोजित भक्त निवास ( शिंदे गल्ली मागे).
  • मंदिर परिसरातील अंतर्गत (पोच) रस्ते (२० फ)
  • वैश्नव गल्ली रोड.
  • दिवाण गल्ली रोड.
  • चाबुकस्वार रोड.
  • शिंदे गल्ली ते पाटील गल्ली रोड.

विकास आराखड्यात काय आहे
मंदिर परिसरातील २५० स्वेअर मीटर परिसर रिकामा करावा. ६० खोल्यांचे भव्य भक्त निवास, तीन प्रसादालय, गार्डन, अध्ययन कक्ष, भक्ती केंद्र, पाच हजार भावीक बसतील असा भव्य सभामंडप. 

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Konkan Railway: मुंबईहून सावंतवाडीला सुटणार विशेष गाड्या; गणेशोत्सवात प्रवाशांना दिलासा

Manchar News : मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागताची आंबेगाव तालुक्यात जय्यत तयारी; तीन हजार समाज बांधव मुंबईत जाणार

Latest Marathi News Updates: वेळ पडली तर गेवराईतून निवडणुकीला उभं राहणार- हाके

Asia Cup 2025: Inshallah! भारतीय संघाला दोन्ही सामन्यांत धुळ चारू; IND vs PAK मॅचपूर्वी हॅरिस रौफचा फाजील आत्मविश्वास

Ganesh Chaturthi 2025: आपण गणपती बाप्पा 'मोरया' का म्हणतो? हे आहे कारण

SCROLL FOR NEXT