file photo 
मराठवाडा

‘फॅक्टर इंजेक्शन’ने वाचले युवकाचे प्राण

गणेश पांडे

परभणी : हिमोफिलिया या रक्ताच्या गंभीर अनुंवशिक आजाराने ग्रस्त असलेल्या मुखेड (जि. नांदेड) येथील सुनील शिंदे या २३ वर्षीय युवकांला वेळेतच फॅक्टर इंजेक्शन मिळाल्याने सदरील युवकाचे प्राण वाचविण्यात परभणी जिल्हा रुग्णालयातील यंत्रणेला यश आले आहे. थॅलेसिमिया सपोर्ट ग्रुपच्या सहकार्याने हे मोठे काम सहजरीत्या शक्य झाले आहे.


मुखेड (जि. नांदेड) येथील सुनील शिंदे (वय २३) हे हिमोफिलिया या रक्ताच्या गंभीर आनुवंशिक आजाराने ग्रस्त आहेत. या आजारात रुग्णाचे शरीरात जन्मतः फॅक्टर या रक्तातील घटकांची कमतरता असल्याने रुग्णास अंतर्गत अथवा बाह्य स्वरूपाचा रक्तस्त्राव झाल्यास रक्त गोठत नाही व प्रसंगी गंभीर प्रसंगाला सामोरे जावे लागते. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांतील मिळून एकूण जवळपास ६०० रुग्ण आहेत. या सर्व रुग्णांना हे महागडे इंजेक्शन मोफत व कमीत-कमी वेळात मिळावे. रुग्णाचे प्राण वाचावे या करिता परभणीतील लक्ष्मीकांत पिंपळगावकर यांनी शासन स्तरावर पाठपुरावा करून थॅलेसेमिया सपोर्ट ग्रुपच्या माध्यमातून जिल्हा सामान्य रुग्णालयात हे इंजेक्शन मोफत उपलब्ध करून घेतले. याचा फायदा मराठवाडातील लातूर, बीड, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली येथील ६० रुग्णांना झाल्याने त्यांचे प्राण वाचले आहेत.

ही मोफत सेवा २४ तास उपलब्ध
कोरोनाच्या या आणीबाणीच्या परिस्थितीत ही परभणी थालेसिमिया सपोर्ट ग्रुपच्या माध्यमातून लक्ष्मीकांत पिंपळगावकर यांनी ही सुविधा परभणी येथे २४ तास उपलब्ध करून दिल्याने मराठवाड्यातील हिमोफिलिया रुग्णांच्या सर्व पालकांना होणारा आर्थिक, मानसिक व शारीरिक त्रास कमी झाला आहे. परिणामी समाधान रुग्ण व त्यांचे पालक समाधान व्यक्त करत आहेत.

दोन महिन्यांत १९ बालकांना ३७ वेळा रक्तसंक्रण
जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय जिंतूर येथे गेल्या दोन महिन्यांपासून १९ बालकांना ३७ वेळा रक्तसंक्रमन करण्यात आले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्री. चांडगे, बालरोगतज्ज्ञ डॉ. श्री. चव्हाण, आर. बी. यस्के, वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्चना भायेकर व सर्व कर्मचारी यांच्या सहकार्याने तालुक्यातील सर्व पालकांना कोरोना या आणीबाणीच्या प्रसंगात खूपच मोठा दिलासा मिळल्याने समाधान व्यक्त होत आहे. उपजिल्हा रुग्णालय सेलू व गंगाखेड येथे तालुक्यातील सर्व थॅलेसिमिया बालकांना वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्री. हरबडे, डॉ. हेमंत मुंढे यांच्या मार्गदर्शनामध्ये रक्तसंक्रमन करण्यात येत आहे. जिल्हा रक्तपेढीतील वैद्यकीय अधिकारी श्रीमती राठोड व इतर कर्मचारी या रुग्णाला रक्त कमी पडू नये या करिता विशेष मेहनतीने पाठिंबा देत आहेत.

रुग्णांसाठी मोफत सेवा 
थॅलेसिमिया ग्रस्त बालकांना असेच सहकार्य मिळत राहिल्यास निश्चितच त्यांचे आयुष्यमान वाढण्यासाठी मदत होईल. जिल्ह्यातील थॅलेसिमियाग्रस्तासह मराठवाड्यातील या रुग्णांसाठी परभणीत ही सेवा आम्ही मोफत देत आहोत.
- लक्ष्मीकांत पिंपळगावकर, परभणी
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! ऑगस्ट महिन्याचा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरूवात, १५०० की ३०००? असं करा चेक

Ashutosh Ranka Detained : कॉकरोच जनता पार्टीचे नेते आशुतोष रांका यांच्यासह अनेकांना आसाममध्ये घेतलं ताब्यात

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणी मोठी अपडेट

Central Railway: दिवाळी, छठपूजेसाठी मध्य रेल्वेच्या ४१८ गाड्या, आरक्षण सुरू; 'अशी' करा सीट बुक

IND vs WI, 1st ODI: नमन धीरचे भारतासाठी पदार्पण! जडेजाचे कमबॅक, पण सिराजला जागा नाही; कशी आहे Playing XI

SCROLL FOR NEXT