जालना : दुकानात बनावट सॅनिटायझरबाबत झाडाझडती घेताना पथक. 
मराठवाडा

जालन्यात सहा लाखांचे बनावट सॅनिटायझर जप्त 

सकाळ वृत्तसेवा

जालना - कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी आरोग्य विभागाकडून सॅनिटायझरने हात स्वच्छ करण्याचा सल्ला दिला जात आहे. त्यामुळे बनावट सॅनिटायझर विक्रीचे प्रकारही उघड होत आहेत. जालन्यातील एका दुकानावर गुरुवारी (ता.१९) पोलिस, अन्न व औषध प्रशासनाने व तहसील कार्यालयाच्या पथकाने छापा टाकून सुमारे सहा लाख रुपयांचे बनावट सॅनिटायझर जप्त केले आहे. 

जालना शहरात आनंद बंब यांच्या कल्पना एम्पोरियम होलसेल शॉपमध्ये बनावट सॅनिटायझरचा साठा असल्याची माहिती पोलिस प्रशासनाला मिळाली. त्यानुसार पोलिस प्रशासन, तहसील प्रशासन व अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने कल्पना एम्पोरियमवर गुरुवारी (ता.१९) सायंकाळी छापा टाकून झाडझडती घेतली. या छाप्यादरम्यान सुमारे सहा लाख रुपयांचे बनावट सॅनिटायझरचा साठा जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार श्रीकांत भुजबळ, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय देशमुख यांच्यासह पोलिस कर्मचारी, अन्न व औषध अधिकारी, कर्मचारी आदींनी केली आहे. 

याप्रकरणी शॉपचे मालक संशयित आनंद बंब याला ताब्यात घेतल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी दिली. दरम्यान, याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. 

साठा मोजण्यासाठी पाच तास 

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर सॅनिटायझरने हात स्वच्छ करीत आहेत. वाढती मागणी लक्षात घेता या दुकानात बनावट सॅनिटायझरचा मोठ्या प्रमाणावर साठा करण्यात आला होता. तीन विभागाच्या पथकाला हा साठा मोजण्यासाठी तब्बल पाच तासांपेक्षा अधिक वेळ लागला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT