Farm Bills 2020 Farm Bills 2020
मराठवाडा

Farm Bills 2020: उस्मानाबादेत कृषी कायदे रद्द करण्याची मागणी

लोकसभेत कोणतीही चर्चा होऊ न देता केवळ संख्येच्या जोरावर कायद्यात रूपांतर करण्यात आले. त्यास विरोध करणारे हे निवेदन आहे

सकाळ वृत्तसेवा

उस्मानाबाद: देशातील शेतकऱ्यांना गुलाम बनविणारे तीनही कृषी कायदे (Farm Bills 2020) तत्काळ रद्द करा, सर्व शेतीमालाला कायद्याचे संरक्षण द्या, या मागणीसाठी जनआंदोलन संघर्ष समितीच्यावतीने शनिवारी (ता. पाच) मागणी दिवस पाळण्यात आला. शिवाय संघर्ष समितीने जिल्हा प्रशासनाच्या मार्फत भारत सरकारला निवेदन दिले.

कोरोनाच्या संकट काळात जनता आपला बचाव करण्यात व्यस्त असताना केंद्र सरकारने त्याचा फायदा उठवत एक वर्षापूर्वी शेती क्षेत्रात आमूलाग्र बदल करणारे तीन अध्यादेश पारीत केले. लोकसभेत कोणतीही चर्चा होऊ न देता केवळ संख्येच्या जोरावर कायद्यात रूपांतर करण्यात आले. त्यास विरोध करणारे हे निवेदन आहे.

सरकार सातत्याने बहुमताच्या जोरावर शेतकरी व कामगार विरोधी कायदे आणत आहे. वर्षानुवर्षे लढून मिळविलेले अधिकार यामुळे संपुष्टात येत आहेत. दिल्लीच्या सीमेवर लाखो शेतकरी ठाण मांडून बसले आहेत, त्यास सहा महिने होत आहेत. शेतकरी विरोधी तीन जुलमी कायदे रद्द करण्याऐवजी शेती व्यवस्था अदानी, अंबानी, वॉलमार्ट यांच्या ताब्यात देण्याचे काम सरकार नव्या कायद्यानुसार करीत आहे. केंद्र सरकारने शेतकरी विरोधी जुलमी कायदे मागे घ्यावेत, असेही निवेदनात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Crackers Ban : सर्वोच्च न्यायालयाचा फटाक्यांबाबत मोठा निर्णय; देशभरात बंदी घालता येणार नाही पण...

IND vs WI 2nd ODI : वादाला निमित्त! OUT or NOT OUT? नमन धीरचा अफलातून झेल, पण विंडीजला तो नाही पटला... Video पाहून ठरवा

Maratha Reservation: अंतरवालीमधील कोणी टीका केली तर दुर्लक्ष करा ; जरांगे . गावाचे योगदान विसरणार नाही

Latest Marathi News Live Update : काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी सिरीवेल्ली प्रसाद पाच दिवस मुंबई दौऱ्यावर; बैठकांना सुरुवात

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

SCROLL FOR NEXT