वीज पडून मृत्यू esakal
मराठवाडा

वीज पडून एका शेतकऱ्यासह बैलाचा मृत्यू

जळकोट तालुक्यातील रावणकोळा येथील घटना

सकाळ वृत्तसेवा

जळकोट (जि. लातूर) - रावणकोळा (ता. जळकोट) येथे शेतात रविवारी (ता. १९ ) चारच्या सुमारास वीज पडून एका शेतकरी व एका बैलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत माहिती अशी कि, शेतकरी मारोती गणपती वाघमारे वय ५५ वर्षे रा. रावणकोळा, ता. जळकोट हे सकाळी पेरणीसाठी बैलजोडी घेऊन शेतात पेरण्यासाठी गेले होते. ता.१९ रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास आकाश काळे ढग येऊन विजेचा कडकडाटसह हालका पाऊस पडत होता. पाऊस येत असल्याने शेतकरी आपल्या बैलजोडीला घेऊन एका झाडा खाली आसरा घेत होता. मोठ्या प्रमाणात विजेचा कडकडाट होत होता. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास झाडावर अचानक वीज पडल्याने झाडाखाली थांबलेल्या एका शेतकऱ्यांचा व बाजूला असलेला एक बैलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.

वीज पडल्याने शेतकऱ्यांसह बैलाचा मृत्यू झाल्याची माहिती गावकऱ्यांना कळताच गावातील नागरिकांनी धाव घेऊन घटनेची माहिती तहसीलदार सुरेखा स्वामी यांना दिली.तातडी ने तहसीलदार यांनी तलाठी,महसूल कर्मचाऱ्यांना जायमोक्यावर जाऊन पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत.पंचनामा करुन तहसील कार्यालयाकडे सुपूर्द करण्यात आला आहे.एका गरीब शेतकप्यांचा वीज पडून मृत्यू झाल्याने रावणकोळा येते हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.तातडीने शासनाने मृत्यू पावलेल्या कुंटूबाला तात्काळ मदत देऊन सहकार्य करावे अशी मागणी सरपंच सत्यवान पाटील,मंगेश हुडेकर,सत्यवान दळवे आदिसह गावकऱ्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : पिंपरी चिंचवड हादरले ! निगडीतील मंदिरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; मेट्रो कामगाराला पोलिसांनी घेतले ताब्यात

एका क्षणात सगळं बदललं ! मधू कांबीकरांच्या आयुष्यातील सर्वात कठीण प्रसंग, स्टेजवर नाचल्या, अन्...!

सारा तेंडुलकरच्या बर्थडे पार्टीत तिला घट्ट मिठी मारणारा तो तरुण कोण? वहिनी सानिका पाहतच राहिली; Video Viral

Latest Marathi News Live Update : मोदी सरकार ज्ञानेशकुमार यांचं संरक्षण करतंय, राहुल गांधी यांचा आरोप

Kolhapur Ambabai Temple : नवरात्रोत्सवात नाही, तर कधी वाजणार? अंबाबाई मंदिर परिसरातील ‘म्युझिकल खांब’ बंदच; लाखो रुपये खर्च

SCROLL FOR NEXT