Electric Shock KilleDharur Beed esakal
मराठवाडा

Beed News : विजेच्या तीव्र धक्क्यात शेतकऱ्यासह दोन बैल ठार; शेतात कोळपणी करताना दुर्घटना

Electric Shock : या घटनेत शेतकऱ्यांसोबत दोन सालगडी होते. या दोघांना पाच ते दहा फुटापर्यंत फेकले गेले.

सकाळ डिजिटल टीम

दोन सालगड्यांसह बाळासाहेब डापकर शेतात असलेल्या विजेच्या खांबा जवळील तारेला लोखंडी कोळपेचा स्पर्श झाल्याने विजेचा तीव्र धक्का बसला.

किल्लेधारूर (बीड) : शेतात सोयाबीन पिकाच्या अंतर मशागतीचे काम करत असताना विजेचा तीव्र धक्का (Electric Shock) बसल्याने एक शेतकरी (Farmer) व दोन बैल ठार झाल्याची घटना (ता. १) रोजी सकाळी अकरा वाजेदरम्यान धारूर तालुक्यातील संगम येथे घडली.

बाळासाहेब बाबासाहेब डापकर (वय ४०, रा. संगम ता. धारूर) मयत शेतकऱ्याचे नाव असून सकाळी ११ वाजेच्या दरम्यान शेतात कोळपणी करत असताना दोन सालगड्यांसह बाळासाहेब डापकर शेतात असलेल्या विजेच्या खांबा जवळील तारेला लोखंडी कोळपेचा स्पर्श झाल्याने विजेचा तीव्र धक्का बसला.

नेत शेतकऱ्यांसोबत दोन सालगडी होते. या दोघांना पाच ते दहा फुटापर्यंत फेकले गेले. यावेळी शेतकरी बाळासाहेब डापकर यांना व दोन्ही बैलांना विजेचा तीव्र धक्का बसल्याने जागेवर मयत झाले असून माजलगाव येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheikh Hasina: १५० हून अधिक खटले, फाशीची भीती... तरीही शेख हसीना डिसेंबरमध्ये बांग्लादेशात का परतणार? जाणून घ्या कारण...

MD Drugs Crackdown: रत्नापूर प्रकरणानंतर राज्यात एमडी ड्रग्जचे जाळे उघड; अमरावती, कोल्हापूर, जळगाव, कळंब येथेही जप्ती

Shehbaz Sharif: ''भारताच्या बेकायदेशीर कारवाईला सात वर्षे पूर्ण, पण...'', 'कलम 370'वरुन पाकच्या पंतप्रधानांचे भारतावर गंभीर आरोप

Land Scam : बनावट कागदपत्रांद्वारे कोट्यवधींची जमीन हडपण्याचा प्रयत्न; तिघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Cooperative Scam: पतसंस्थेतील आठ लाखांची बचत बुडाल्याचा धक्का; मानसिक तणावातून शेतकऱ्याची गळफास घेऊन जीवन संपविले.

SCROLL FOR NEXT