3crime_201_163
3crime_201_163 
मराठवाडा

जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्याने घेतले विष, पालकमंत्री टोपे आढावा बैठकीसाठी आले असताना घडली घटना

उमेश वाघमारे

जालना : अवैध सावकारीच्या पैशातून निर्माण झालेल्या शेत जमिनीच्या वादावरून एका शेतकऱ्याने जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (ता.पाच) विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री राजेश टोपे हे आढावा बैठकीसाठी आले होते. दरम्यान विलास लासीराम राठोड (रा.पाथरूड, ता. जालना) असे आत्महत्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार मागील काही वर्षांपूर्वी विलास राठोड यांच्या वडिलांनी १९९०-९१ मध्ये दत्तु तुळशीराम किटाळे व कोडिंबा तुळशीराम किटाळे यांच्याकडून दोन हेक्टर ३९ आर शेत जमिनी खरेदी केली होती. मात्र, त्याचे खरेदी खात झाले नव्हते. दरम्यान बहिणीच्या लग्नासाठी त्याच जमिनीतील ८० आर शेत जमीन ही नातेवाईक हेमा दामा आढे (रा.भोसा, ता. सिंदखेडराजा, जि. बुलढाणा) यांच्या नावे करून व्याजाने ८० हजार रुपये घेतले.

दरम्यान नातेवाईक हेमा दामा आढे व विलास राठोड यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे हेमा दामा आढे यांच्या मुलांसह नातेवाईकांनी शेत जमिन परत देण्यासाठी १८ ते २० लाख रुपयांची मागणी केली असून जमिनीवर ताबा करू असे सांगितले आहे. तसेच त्यांच्या तक्रारीवरून विलास राठोड यांच्या विरुद्ध सेवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा जमिनीचा वाद मागील काही वर्षांपासून सुरू आहे.
दरम्यान सोमवारी (ता.पाच) जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे हे आढावा बैठक घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते.

याच वेळी जालना तालुक्यातील पाथरूड येथील शेतकरी विलास राठोड हे जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी शेत जमिनीवर कब्जा करण्याची धमकी देणाऱ्यासह अवैध सावकारी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करत विषारी औषध प्राशन केले. दरम्यान या प्रकारानंतर तालुका जालना पोलिसांना माहिती देण्यात आली. जालना तालुका पोलिसांनी त्यांना गांधी चमन येथील जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

Ankita Lokhande : "तिला स्टुडंट ऑफ द इयर 3ची ऑफर मिळालीच नव्हती"; अफवांवर अंकिताच्या टीमकडून स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : “लव्ह जिहाद, भू जिहादनंतर आता व्होट जिहाद”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर टीका

Akshaya Tritiya 2024 : कधी आहे अक्षय्य तृतीया? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्व

Lok Sabha Election: उन्हाचा कहर वाढला! निवडणूक आयोग सतर्क, बिहारनंतर या राज्यातही मतदानाची वेळ वाढवली

SCROLL FOR NEXT