file photo 
मराठवाडा

परभणी जिल्ह्यात वाॕट्सअपला स्टेटस ठेऊन शेतकऱ्याची आत्महत्या !

कृष्णा पिंगळे

सोनपेठ ( जिल्हा परभणी ) : कर्ज फेडीसाठी धमक्यांच्या त्रासाला कंटाळून तरुण शेतकऱ्याने विष प्राशन करून आपली जिवनयात्रा संपवल्याची अत्यंत दुर्दैवी घटना मंगळवार (ता. दोन) रोजी दुपारी तालुक्यातील तिवठाणा येथे घडली. चंद्रकांत उर्फ मुंजाजी भगवान धोंडगे ( वय ३० वर्षे ) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. धक्कादायक म्हणजे सुसाईड नोटचे व्हाट्सअपला स्टेट्स ठेऊन त्याने विषारी द्रव्य प्राशन करुन आत्महत्या केली. 

सोनपेठ तालुक्यातील तिवठाणा येथिल तरुण चंद्रकांत उर्फ मुंजाजी भगवान धोंडगे याने मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास आपल्या व्हाट्सअपला स्टेट्सवर मी शेतात आहे, माझी उद्या सकाळी माती आहे. सर्वांनी यावे. मला पैश्यामुळे धमक्या येत आहेत, म्हणून मी आत्महत्या करत आहे.
माझ्या मुलांचा सांभाळ करावा, पैश्यामुळे मला त्रास झाला असा मजकूर असलेल्या चीठ्यांचे फोटो स्टेट्सवर ठेवले. यानंतर त्याने शेतात विषारी द्रव्य प्राशन केले.

चंद्रकांत याने व्हाट्सअपवर ठेवलेल्या स्टेट्सची माहिती त्याचे चुलते हनुमान गणपतराव धोंडगे यांना मिळताच त्यांनी शेतात धाव घेतली. अत्यवस्थ चंद्रकांतला त्यांनी दुपारी दीड वाजण्याचे सुमारास गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. येथे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वाती मुंडे यांनी त्याला तपासून मृत घोषीत केले. त्याच्या पश्चात पत्नी, सहा वर्षीय मुलगा, दोन वर्षीय मुलगी,एक भाऊ, एक विवाहित बहीण असा परिवार आहे. गंगाखेड पोलीस ठाण्याचे हवालदार एम. जी. सावंत, हवालदार गोविंद मुरकुटे यांनी पंचनामा केला. या अनुषंगाने आवश्यक कागदपत्रे सोनपेठ पोलिसांच्या ताब्यात घेतले असून पोलिस पुढील तपास करीत आहेत. 

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026: भारताला मिळालं ५ वं गोल्ड! नीरु ढंडाने एकाच दिवशी दोन पदकं जिंकून रचला इतिहास

Mumbai Protest: मुंबईत मातंग समाज आक्रमक! अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणाच्या समर्थनात उग्र आंदोलन, पोलिसांचा लाठीचार्ज

Maharashtra Sugar Season 2026 : साखर कारखाने 15 ऑक्टोबरपूर्वीही सुरू करा, विरोध डावलून शासनाकडून परिपत्रक जारी; नवा संघर्ष पेटण्याची शक्यता

Marathi News Live Updates: मातंग समाजाचा मुंबईत मोर्चा; सीएसएमटी ते मंत्रालय मार्गावर रस्ता अडवण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड

Pune MLC Election: शिक्षक, पदवीधर’ची आजपासून रणधुमाळी ;दोन दिवसांत जागा वाटप; सहा ऑक्टोबर अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT