Farmer Destroyed Papayas
Farmer Destroyed Papayas 
मराठवाडा

पपई बागेवर फिरविला नांगर; कोरोना, विषाणु हल्ल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संक्रांत

कमलेश जाब्रस

माजलगाव (जि.बीड) : पारंपरिक पिकांच्या लागवडीत नेहमीच घाटे का सौदा होत असल्याने पपई बागेची लागवड केली होती. पपई चांगली देखील आली होती. परंतु कोरोनामुळे पडलेल्या टाळेबंदीत पपईची विक्री अडकली तर वातावरणातील बदलामुळे पपईवर झालेल्या विषाणु हल्ल्यामुळे पपई बागेवर नांगर फिरविण्याची वेळ तालुक्यातील घळाटवाडी येथील दिनकर पठाडे या शेतकऱ्यावर ओढावली असून केलेला खर्च देखील निघाला नसल्याने आता या शेतकऱ्यास मदतीची अपेक्षा आहे.
मागील वर्षी धरण भरल्यामुळे आणि पारंपरिक पिकांचे वातावरणातील बदलामुळे होत असलेला परिणाम यामुळे तालुक्यातील घळाटवाडी येथील शेतकरी दिनकर पठाडे यांनी पपई बागेची जानेवारी महिन्यात पाच बाय सात अंतरावर सोलापूर येथून तेरा रूपये प्रतिरोप असे एक हजार पपई रोप आणून ठिबकवर लागवड केली होती.

बागेला वेळोवळी फवारण्या, खत, पाणी मिळत असल्याने बाग बहरात होती. या बागेला जवळपास एक लाख रूपयांपर्यंत या शेतकऱ्याने खर्च केला होता. त्यामुळे शेतकऱ्यास जवळपास चार ते पाच लाख रूपयांचे उत्पन्न अपेक्षित होते. परंतु पपईवर विषाणुच्या झालेल्या प्रादुर्भावामुळे झाडांचे पूर्णतः पाने गळुन पडली. सूर्यप्रकाश फळावर पडल्याने फळे सडली तर कोरोनाच्या टाळेबंदीमुळे पपईला बाजारपेठ मिळाली नाही. व्यापारी येऊन गेले परंतु खरेदीसाठी धजावले नाहीत. त्यामुळे या शेतकऱ्याने या पपई बागेवर नांगर फिरविला आहे. दरम्यान आता या शेतकऱ्यास मात्र तात्काळ मदतीची गरज आहे.


निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीप, रब्बी हंगामात दरवर्षीच नुकसान होते म्हणुन पपई लागवड केली होती. परंतु या पपईवर देखील झालेल्या विषाणू हल्ल्यामुळे ना विक्री झाली ना अपेक्षाप्रमाणे उत्पन्न मिळाले. नाईलाजास्तव पपईवर नांगर फिरवावा लागला आहे.
- दिनकर पठाडे, शेतकरी, घळाटवाडी

 

 

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: उदयनराजेंच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी कराडमध्ये दाखल

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT