जेवळी (जि.उस्मानाबाद) - दहा एकर क्षेत्रावर जुलैच्या पहिल्या आठवड्यात उडीदाची पेरणी केली होती. पेरणीनंतर पावसाने एक महिना हुलकावणी दिल्याने वाढ खुंटण्याबरोबरच फळधारणा अत्यंत कमी प्रमाणात झाली आहे. यातून राशीचा खर्चही निघणार नसल्याने संपूर्ण दहा एकर उडीद पिकावरती शेतकऱ्याला रोटाव्हेटर मारावे लागले. 
मराठवाडा

शेतकऱ्याने उडदाच्या फडात रोटाव्हेटर फिरवून पिक मोडीत काढले

सुधीर कोरे

जेवळी (जि.उस्मानाबाद) - सुरुवातीला उशीरा पेरणी (Sowing). त्यानंतर पावसाने (Rain Shortage) मारलेल्या प्रदीर्घ खंडाने पिकांची वाढ खुंटण्याबरोबरच फळधारणा झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक चक्र कोलमडले आहे. उडदाच्या पोत्याचे उत्पादन यंदा आदली-पायलीत आले आहे. यातून उत्पन्न खर्च निघत नसल्याने जेवळी (ता.लोहारा) (Lohara) येथील एका शेतकऱ्याने दहा एकर उडदाच्या फडात चक्क रोटा व्हेटर फिरवून पीक मोडीत काढले आहे. परिसरात गेल्या तीन-चार वर्षांपासून कधी पावसाअभावी, तर कधी अतिवृष्टीने शेतकऱ्यांचा हंगाम वाया जात आहे. पूर्णपणे शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना बिकट आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. गेल्या वर्षी सुरुवातीच्या टप्प्यात पावसाचा पडलेला खंड व शेवटच्या टप्प्यात अतिवृष्टीने पिकांचा झालेला (Osmanabad) नुकसान सोसणाऱ्या शेतकऱ्यांना (Farmer) यंदाच्या खरीप हंगामाकडून मोठी आशा निर्माण झाली होती.

यंदा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पडलेल्या पावसावर परिसरातील काही शेतकऱ्यांनी पेरणी केली. त्यानंतर मात्र पावसाने प्रदीर्घ दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांचा पेरण्या रखडल्या. जून महिन्याच्या सुरुवातीला पडलेल्या पावसानंतर बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणी उरकली. पेरणीनंतर मात्र जवळपास एक महिना पावसाने ओढ दिली. ही पावसाची प्रदीर्घ दडी जीवघेणी ठरली. यात दिवसभर कडक ऊन पडल्याने शेतकऱ्यांचे नगदी पीक म्हणून ओळखले जाणारे सोयाबीन, मूग, उडीद पिकांना मोठा फटका बसला आहे. पावसाने मारलेल्या प्रदीर्घ खंडाने पिकांची वाढ खुंटण्याबरोबर अत्यल्प फुल व फळधारणा झाली. उडीद पिकावरील शेतकऱ्यांच्या अपेक्षा आता संपल्या आहेत. उत्पन्नापेक्षा खर्चाचा हिशोब दुप्पट दिसून येते आहे. यातून उत्पन्न खर्च निघत नसल्याने जेवळी येथील युवा शेतकरी कल्याणी घोडके यांनी आपल्या दहा एकर उडदाच्या फडात चक्क रोटाव्हेटर फिरवून पीक मोडीत काढले आहे. यामुळे शेतकऱ्याला लाखो रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Smart Meter Camera: 'महावितरण'च्या स्मार्ट मीटरमध्ये खरंच कॅमेरा आहे का? वीज वितरण कंपनीकडून स्पष्टीकरण

Latur Police Raid: वाढवणा पोलिसांची तिर्रट जुगार अड्ड्यावर धाड; २३.३५ लाखांचा मुद्देमाल जप्त, ८ जणांविरुद्ध गुन्हा

Inter-State Robbery Gang: ओतूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; दरोड्याच्या तयारीतील आंतरराज्यीय टोळी जेरबंद

Pune News : सासरच्या मंडळींकडून जावयांना मारहाण; एकाचे नाकाचे हाड मोडले, तर दुसऱ्याला बॅटने झोडपले!

Dnyaneshwar Wakade case: बीडमध्ये भररस्त्यात थरार! ज्ञानेश्वरवर दगड, विटा ,चाकूने वार! नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT