Jalna News esakal
मराठवाडा

मोटार चालू करताना विजेचा शॉक लागून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

विजेचा शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू

दीपक सोळंके

भोकरदन (जि.जालना) : विहिरीवरील विद्युत मोटार चालू करीत असताना अचानक स्विच बोर्डात करंट उतरल्याने विजेचा जोरदार शॉक (Electric Shock) लागून भोकरदन तालुक्यातील कोपर्डा गावातील शेतकऱ्याचा बुधवारी (ता.आठ) सकाळी साडेसहा वाजेदरम्यान जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. ज्ञानेश्वर सुखदेव पाबळे ( वय ४६ ) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार ज्ञानेश्वर पाबळे यांची भोकरदन (Bhokardan) तालुक्यातील कोपर्डा गावालगत शेतजमीन आहे. (Farmer Died Due To Electric Shock In Bhokardan Taluka Of Jalna)

बुधवारी सकाळी ते जनावरांना पाणी पिण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याच्या हौदात पाणी भरण्यासाठी विहरीवरील विद्यूत मोटार चालू करण्यासाठी गेले होते. यावेळी अचानक स्विच बोर्डात करंट उतरल्याने ज्ञानेश्वर पाबळे यांना विजेचा जोरदार शॉक (Electric Shock) लागला. ही बाब घरच्यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने ज्ञानेश्वर यांना भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत्यू घोषित केले. (Jalna News)

ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून दुपारी बारा वाजता कोपर्डा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे नातेवाईकांनी सांगितले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. या प्रकरणी भोकरदन पोलिसांकडून पंचनामा करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TV Advertising Rules: टीव्हीवर आता जास्त जाहिराती दिसणार? केंद्र सरकारने २० वर्षांचा नियम हटवला; दर्शकांवर काय परिणाम होणार?

CM Vijay Trisha Viral News : चेन्नईत काय घडलं? थलपती विजय यांना पाहताच अभिनेत्री त्रिशानं मारला कडक सॅल्यूट; तिच्या पिवळ्या साडीतील लूकनंही वेधलं लक्ष

तब्बल १० वर्ष सोनाली कुलकर्णीसोबत बोलत नव्हता सिद्धार्थ जाधव; कारण सांगत अभिनेत्री म्हणाली, 'जेव्हा श्रीदेवींचं निधन झालं...'

Marathi News Live Updates : सर्वांमध्ये एकता, देशाबद्दल प्रेम आणि सद्भावना असायला हवी - रितू तावडे

स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला निघालेल्या मुली, ट्रॅव्हल्सने दुचाकीला धडक दिल्यानं ३ मैत्रिणींचा मृत्यू

SCROLL FOR NEXT