farmer from Gevrai taluka committed suicide sugarcane farm beed  sakal
मराठवाडा

साखर आयुक्त, प्रादेशिक संचालकांची उसाच्या फडात काढली प्रतिकात्मक प्रेतयात्रा

शेतकरी संतापला; अतिरिक्त उसाचा प्रश्न चिघळतोय

- कमलेश जाब्रस

माजलगाव : अतिरिक्त उस प्रश्नावर आणि या उसांमुळेच गेवराई तालुक्यातील शेतकरी आत्महत्या प्रकरणी शेतक-यांमध्ये संतापाचे वातावरण असुन अतिरिक्त उस प्रश्न चिघळल्याने संतापलेल्या शेतक-यांनी आनंदगाव येथे उसाच्या फडामध्ये साखर आयुक्त व प्रादेशिल संचालकांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढत बुधवारी (ता. 25) आक्रोश व्यक्त केला. गेवराई तालुक्यातील शेतक-याने उसाच्या फडात उस पेटवुन देउन आत्महत्या केली.

याप्रकरणात दोषी असणारे साखर आयुक्त व प्रादेशिक सहसंचालक यांचेवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच शासनाने 1 मे पासुन गाळप करण्यात येणा-या उसाचा कारखानदारास प्रतिटन 200 रूपये देण्याचा निर्णय घेतला आहे तो रद् करून प्रतिटन 200 रूपयांप्रमाणे शेतक-यांना ही रक्कम देण्यात यावी या इतर मागण्यांसाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने गंगाभिषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली आनंदगाव येथे बुधवारी सकाळी साखर आयुक्त व प्रादेशिक सहसंचालक यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली. दरम्यान तालुक्यामध्ये निर्माण झालेला अतिरिक्त उसाचा प्रश्न कारखानदारांनी व प्रशासनाने मार्गी लावावा अशी मागणीही श्री. थावरे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: एससी-एसटी कायद्यातील तरतुदींना आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली; नेमकं प्रकरण काय?

Vishakha Raut: विशाखा राऊतांना दिलासा, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; प्रिया सरवणकरांच्या नियुक्तीला ब्रेक

IND vs JPN, Video: पहिलाच बॉल अन् अभिषेक शर्माची जपानच्या १७ वर्षांच्या पोरानं घेतली विकेट; नकोसे विक्रमही झाले नावावर

काटोल नगराध्यक्षांचे पद धोक्यात; अर्चना देशमुख यांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका

Marathi News Live Updates : दुष्काळी भागाच्या पाहणीसाठी आमदार शेतक-याच्या बांधावर

SCROLL FOR NEXT