beed
beed sakal
मराठवाडा

Beed : सततच्या पावसामुळे उडदाचे नुकसान

अनिरुद्ध धर्माधिकारी

आष्टी : सततच्या पावसामुळे काढणीला आलेले उडीद पीक डोळ्यादेखत भिजत असल्यामुळे उत्पादकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे. पावसाळ्याच्या सुरवातीला पावसाने उशीर केल्याने पेरण्या लांबल्या होत्या. यानंतर पावसाचा खंड व आता गेल्या १५ दिवसांपासून सतत सुरू असलेला पाऊस, यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. यामुळे उत्पादनात ७० ते ८० टक्क्यांहून अधिक घट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आष्टी तालुक्यात नगदी पीक म्हणून उडदाच्या पिकाकडे पाहिले जाते. तब्बल ३८ हजार हेक्टर क्षेत्रावर यंदा शेतकऱ्यांनी उडदाची पेरणी केलेली आहे. यावर्षी खरीप हंगामात पावसाळ्याच्या सुरवातीला पावसाने ओढ दिल्याने पेरण्या लांबल्या होत्या. जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्गाने कशाबशा पेरण्या उरकून घेतल्या. पिकेही जोमात आली. मात्र, यानंतर सुमारे दीड महिना पावसाने ओढ दिली.

त्यामुळे पिके शेतातच सुकून गेली. यानंतर गेल्या १५ दिवसांपासून तालुक्यात कमी-अधिक प्रमाणात सातत्याने पाऊस सुरू आहे. रविवारी तालुक्यातील काही भागात जोरदार व मध्यम स्वरूपाच्या पावसानंतर सोमवारी सकाळपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू होता. या पावसामुळे शेतात काढून ठेवलेले व उभे असलेली उडदाचे पीक भिजून गेले आहे. काही ठिकाणी पिकाला कोंबही फुटत आहेत. उडदाबरोबरच बाजरी, व सोयाबीन पिकांचेही मोठे नुकसान झाले असून, थोडेफार उत्पादन हाती आले तरी भिजलेल्या या पिकांच्या झालेल्या उत्पादनाला नेमका किती भाव मिळेल, याची चिंता शेतकरी वर्गाला लागली आहे.

तालुक्याचे पीकनिहाय क्षेत्र

(हेक्टरमध्ये)

उडीद ः ३८ हजार १९८

तूर ः १६ हजार २४९

कापूस ः १६ हजार ८८६

बाजरी ः ९ हजार ८११

सोयाबीन ः ७ हजार ०१२

पेरणी एकूण ः

१ लाख २६ हजार ५१०

पावसामुळे डोळ्यादेखत पिकांचे नुकसान होत आहे. तीन एकर क्षेत्रावर उडदाचे पीक घेतले असून, ३ लाखांच्या उत्पन्नाची मला आशा होती. पण, गेल्या १५ दिवसांपासून रोज थोड्याफार प्रमाणात पाऊस झाल्याने तसेच कालपासून पुन्हा पावसाची झड लागल्याने शेतातील उभे पीक भिजून गेले आहे. आता थोडेफार उत्पादन हाती आले तरी भिजल्यामुळे उत्पन्नाचा दर्जा खालावल्याने कवडीमोल भावाने व्यापाऱ्याला माल विकण्याशिवाय पर्याय राहणार नाही.

-अशोक पोकळे, शेतकरी, चिंचाळा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

Lok Sabha Election 2024 : डमी नावाच्या उमेदवारांना निवडणूक लढविण्यास मनाई करा; प्रकरण कोर्टात पोहचलं पण...

SCROLL FOR NEXT