Farmer Couple Suicide Sakal
मराठवाडा

Ambad News : शेतकरी पती, पत्नीने विषारी औषध प्राशन करून संपविली जीवनयात्रा

अंबड तालुक्यातील बनटाकळी येथे शेतकरी पती, पत्नीने विषारी औषध प्राशन करून संपविली जीवनयात्रा

बाबासाहेब गोंटे

अंबड, जि. जालना - अंबड तालुक्यातील बनटाकळी येथील अल्पभूधारक शेतकरी अशोक नाना कानकाटे (वय-44) वर्षे व त्यांची पत्नी संगीता अशोक कानकाटे (वय-40) वर्षे यांनी बुधवारी (ता. 20) सकाळी गावशिवारातील शेतात विषारी औषध प्राशन करून दोघांनी आत्महत्या करत आपली जीवनयात्रा संपविली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, त्यांच्या वडिलांची तीन एकर शेती त्यांना दोन मुले यामुळे शेजमिनीची वाटणी केल्यानंतर अशोक कानकाटे याला एक एकर तर त्यांचा दुसरा भाऊ यांना एक एकर व वडिलांकडे एक एकर जमीन अशा वाटण्या झालेल्या होत्या. दोन्ही मुले व वडील वेगवेगळे राहत होते. मात्र अशोक कानकाटे यांना दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.

मोठया मुलीचे लग्न झाले. लहान मुलगी इयत्ता सहावी मध्ये शिकत आहे. तर मुलगा बारावी पास होऊन रोजगाराच्या शोधात मुंबई येथे गेलेला होता. अशोक कानकाटे व त्यांची पत्नी संगीता हे नेहमीच अर्थिक विवंचनेत होते. त्यांचाकडे खाजगी, बँकेचे बचत गटाचे कर्ज यामुळे अर्थिक अडचणीत सापडलेले होते.

याचबरोबर शेतात पाण्याअभावी मोसंबीची झाडे जळून चालली होती. सततचा दुष्काळ, घरची अर्थिक परिस्थीती बेताची असल्याने नेहमीच अर्थिक विवंचना,कर्जबाजारी पणामुळे आपली अखेर जीवनयात्रा संपवल्याचे नातेवाईक, मित्रमंडळीतून ऐकायला मिळते.

बनटाकळी शेतशिवारात बुधवारी सकाळी आठ वाजता शेतात जाणाऱ्या शेतकरी यांना अशोक व त्यांची पत्नी संगीता पडलेले दिसले.याची माहिती गावातली त्यांच्या नातेवाईक व ग्रामस्थांना मिळताच सर्वांनी एकच धावपळ केली. त्यानंतर अंबड पोलिसांना या बाबत माहिती देण्यात आली.

अंबड पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरिक्षक जॉन स्कॉट,पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रताप चव्हाण यांनी घटनास्थळी जावून ग्रामस्था समक्ष पंचनामा केला. नातेवाईक, ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉ. केंद्रेकर यांनी तपासून मृत घोषित केले. अंबड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

या घटनेचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रताप चव्हाण हे करत आहे. अशी माहिती ठाणे अंमलदार सेना यांनी दिली आहे. शोकाकुल वातावरणात रात्री उशिरा आत्महत्याग्रस्त शेतकरी यांच्यावर बनटाकळी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुर्दैवी घटनेने परीसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT