Beed 
मराठवाडा

शेतकरी कंगाल, आर्थिक संकटाचा डोंगर

जालिंदर धांडे

बीड - जिल्ह्यातील मुख्य व्यवसाय म्हणजे शेती; परंतु तीन-चार वर्षांपासून जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी होत असल्याने शेती व्यवसाय संकटात आला आहे. यंदा तर भयाण दुष्काळ पडल्याने शेतकरी पूर्णपणे कंगाल झाला आहे. शेतातील कामे नसल्याने प्रशासनाच्या मदतीकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत.

शेतकऱ्यांचे आर्थिक व्यवहार बंद झाल्याने याचा परिणाम जिल्ह्यातील सर्वच व्यवसायांवर होताना दिसत आहे. जिल्ह्यातील शेतकरी नेहमीच दुष्काळात होरपळत आहेत. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सतत कोणाकडून तरी कर्ज घेण्याची वेळ येते. सुरवातीला पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण होते. 

शेतकऱ्यांनी कर्ज काढून बी-बियाणे खरेदी केली; परंतु नंतर पावसाने मारलेल्या दडीने शेतातील सर्व पिके जळून गेली. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे. सध्या शेतातील सर्व कामे ठप्प झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे. जनावरांचा चारा, पाणी, घरसंसार, मुलांचे शिक्षण, मुलांच्या लग्नांचा प्रश्‍न आदी विविध प्रश्‍नांमध्ये शेतकरी अडकून गेला आहे. 

रोजंदारीचे काम सुरू करण्याची गरज
जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या हाताला काम नसल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे प्रशासनातर्फे लवकरात लवकर रोजंदारीची कामे ग्रामीण भागात राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन जिल्ह्यातील दुष्काळी भागात कामे सुरू करण्याची मागणी केली जात आहे. 

शेतकऱ्यांना धीर देण्याची गरज
सध्या जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडले आहेत. यामुळे जिल्ह्यातील विविध संघटना व नागरिकांनी पुढे येत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जमेल तशी मदत करून त्यांना धीर द्यावा, यासह आगामी काळात शेतीबरोबरच एखादा जोडधंदा कशा प्रकारे करता येईल, या संदर्भात मार्गदर्शन केल्यास जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फायदा होईल व येथील शेतकरी सक्षम होण्यास हातभार लागेल.

माझी पंधर एकर शेती असून यंदा शेतात ३० हजारांचा खर्च केला होता; परंतु पावसाने दडी दिल्याने शेतीतील पिके हातची गेली. त्यामुळे यंदा घरदार कसे चालवावे असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. यासह जनावरांच्या चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्‍न निर्माण होत आहे. 
- नानासाहेब चोरमले, शेतकरी, बीड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thalapathy Vijay : मुख्यमंत्री थलपती विजय यांचे सरकार डळमळीत?, फुटण्यासाठी एका आमदाराला ३५ कोटींची ऑफर, तिघांना अटक

LPG Price Today: कमर्शियल LPG सिलेंडर 183 रुपयांनी स्वस्त झाल्यानंतर आता घरगुती गॅसचे दर जाहीर! पाहा तुमच्या शहरातील नवे भाव

Belgium vs Senegal : ३ मिनिटांत बाजी पलटली, बेल्जियमने ०-२ अशा पिछाडीवरून मॅच फिरवली; लढवय्या सेनेगलचा दुर्दैवी पराभव

Latest Marathi News Live Update : एल्फिन्स्टन ब्रिज परिसर जलमय, सखल भागांत पाणी साचल्याने नागरिकांची मोठी गैरसोय

FDA Crime : तुकाराम मुंढेंचा सर्वात मोठा दणका! संभाजीनगर शॉक; प्रसिद्ध 'आईच्या गावात' अन् 'यल्ला यल्ला' हॉटेलला टाळे

SCROLL FOR NEXT