farmer protest for these demand agriculture kruti samiti rahul dhole mahesh gujar gangapur Sakal
मराठवाडा

Farmer Protest : शेतकऱ्याचे शोले स्टाईल आंदोलन! 'या' आहेत मागण्या...

कृषि कार्यालयाच्या इमारतीवरील टॉवरवर चढून आंदोलन

बाळासाहेब लोणे

गंगापूर : तहसीलदार व कृषी अधिकारी विविध मागण्यांचे निवेदन देऊनही कोणतीही ठोस भूमिका न घेतल्याने शेतकरी कृती समितीचे राहुल ढोले व महेश गुजर यांनी कृषि कार्यालयाच्यावर इमारतीवर असलेल्या टावरवर चढून बुधवारी (ता. १३) दुपारी दीड वाजता आंदोलन सुरू केले आहे.

यावेळी तहसिलदार सतीश सोनी यांच्यासह पोलिस प्रशासनाच्या अधिकारी आंदोलनस्थळी दाखल झाले आहेत. २०२२ खरिप पिक विमा यादी नैसर्गिक नुकसान नुसार मंजूर यादी, अंतिम आकडेवारी नुसार मंजूर यादी, पैसे जमा केलेली यादी, पैसे रद्‌द झालेली यादी, पिक विमा नामंजूर शेतकरी यादी देण्यात यावी.

तसेच भारतीय कृषी विमा कंपनीकडे अहवाल आहे त्याच्या तात्काळ प्रति द्‌याव्यात , डोणगाव, आसेगाव, गाजगाव व मांजरी मंडळ दुष्काळ यादीत समाविष्ट का केला नाही ? त्याचा सविस्तर अहवाल त्याचप्रमाणे मंडळ निहाय दुष्काळ यादीत समाविष्ट करण्यासाठी शासनाकडे पाठवलेला प्रस्ताव देण्यात यावा.

गंगापूर तहसीलदार यांना आमरण उपोषण निवेदन दिले होते तेव्हा त्यांनी डोणगाव मंडळातील महावेधचे पर्जन्यमान यंञ तपासणी करणार होते ते झाले नाही तसेच डोणगाव मंडळाचा दुष्काळ यादीत समाविष्ट करण्यासाठी स्वतंत्र अहवाल जिल्हा अधिकारी यांना पाठवणार होते तो पाठवले नाही.

२०२२ खरिप पिक विमापासून धामोरी बु गावातील वंचीत शेतकर्‍यांच्या खात्यात नैसर्गिक नुकसाननुसार तात्काळ पिक विमा जमा करावा, डोणगाव मंडळाचे महावेध पर्जन्यमान यंञ तपासणी करून नविन मंडळ पुर्नरचनेनुसार बसवण्यात,

यावे तसेच डोणगाव मंडळात महसुलचे अद्यावत पर्जन्यमान यंञ तात्काळ बसवण्यात यावे. तात्काळ कृषी विभाग मार्फत तपासणी करून लगेच पर्जन्यमान यंञ बसवण्यात यावे, गंगापूर तालुक्यात २०२२ अतिवृष्टी सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानभरपाईसाठी आधार

प्रमाणीकरण केलेल्या शेतकर्यांच्या खात्यात तात्काळ अनुदान जमा करणे संबधीत अधिकारी यांनी याद्या दिलेल्या नाहीत त्यांच्यावर कारवाई नोटीस काढुन ज्यांनी आधार प्रमाणीकरण केले असेल त्यांच्या खात्यात अनुदान जमा करावे , आदि मागण्या करण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT