Sowing Latur News 
मराठवाडा

दिव्यांग मुलगा अन् पत्नीच्या मदतीने उरकली पेरणी, शेतकऱ्याची कुटुंबासाठी धडपड

प्रशांत शेटे

चाकूर (जि.लातूर) : मॉन्सूनच्या आगमनामुळे शेतकऱ्यांनी पेरणीला सुरवात केली; परंतु ट्रॅक्टर व बैलाच्या साहाय्याने पेरणी करू शकत नसल्यामुळे वडगाव एक्की (ता.चाकूर) येथील अल्पभूधारक शेतकऱ्याला आपल्या दिव्यांग मुलगा व पत्नीच्या सहकार्यातून पेरणी उरकून घ्यावी लागली. वडगाव एक्की येथील अशोक सोपान कदम यांना फक्त ३५ गुंठे जमीन आहे. शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये त्याचे घर असून, दिवसभर शेतातील कामासह मजुरी करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवितात. शेतीच्या उत्पन्नातूनच त्यांनी दोन मुलींचे विवाह केले आहेत.

सध्या एक दिव्यांग मुलासह हे पती-पत्नी राहतात. तालुक्यात तीन दिवसांपासून मॉन्सूनचे आगमन झाले असल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणीला सुरवात केली आहे. श्री.कदम यांना असलेल्या अल्पशा जमिनीमुळे त्यांना दुसऱ्याकडून आणलेल्या बैलाने किंवा ट्रॅक्टरच्या साहाय्याने पेरणी करणे परवडणारे नाही; तसेच सर्वांच्या पेरण्या सुरू असल्यामुळे शेजारच्या शेतकऱ्यांचेही बैल मागता येत नाहीत. यामुळे त्यांनी मुलगा व पत्नीच्या सहकार्यातून पेरणी केली. दिवसभर मुलगा व पत्नी औत धरून ओढत होते, तर अशोक यांनी सोयाबीनची पेरणी केली. सतत कष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविणाऱ्या अशा अल्पभूधारक शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे.


पाऊस झाल्यामुळे पेरणी वेळेत होणे गरजेचे आहे. बैल व ट्रॅक्टरच्या साहाय्याने पेरणी केल्यास त्यांना पैसे द्यावे लागतात. पुढे उत्पन्न किती होणार याची शाश्वती नाही. यामुळे मुलगा व पत्नीच्या मदतीने पेरणी उरकून घेतली.
- अशोक कदम, शेतकरी.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

India Squad for WI Series: रोहित शर्माच्या भविष्याचा फैसला झाला... वेस्ट इंडिजविरुद्ध BCCI ची वन डे, ट्वेंटी-२० संघाची घोषणा

Manoj Jarange Patil: मोठी बातमी! हैदराबाद गॅझेटियरमध्ये नावंसुद्धा सापडली; विखे पाटलांसह शिष्टमंडळ हैदराबादला जाणार?

Vidyadhar Anaskar : राज्य सहकारी बँकेचे ५,७४५ कोटींचे विक्रमी नेटवर्थ; ठेवी कमी करण्याचा निर्णय व्यावसायिक गणितातून

Marathi News Live Updates : मध्य प्रदेशातील सांवर येथे भिंत कोसळून चार महिलांचा मृत्यू, पाच जण जखमी

SCROLL FOR NEXT