केज - घर पाडून रस्ता करून देण्याच्या कारणावरून भावकीतील लोकांकडून सतत होत असलेला त्रास सहन न झाल्याने एका ४९ वर्षीय शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (ता.२५) पिंपळगव्हाण (ता. केज) येथे घडली.
मृत्यूपूर्वी संबंधित शेतकऱ्याने लोकांच्या नावाने लिहून ठेवलेली चिठ्ठी खिशात सापडली आहे. या प्रकरणी सात जणांविरोधात गुन्हा दाखल झाला. रामहरी श्रीरंग गायकवाड (वय-४९) असे मृताचे नाव आहे. तालुक्यातील पिंपळगव्हाण येथील शेतकरी रामहरी गायकवाड यांना त्यांच्या भावकीतील बाळासाहेब श्रीरंग गायकवाड, विजयमाला बाळासाहेब गायकवाड, महेश बाळासाहेब गायकवाड, सचिन राजाभाऊ गायकवाड यांच्यासह प्रियंका ऊर्फ दीदी रामचंद्र चाळक, रामचंद्र नवनाथ चाळक, नवनाथ भागुजी चाळक (तिघे रा. लव्हुरी, ता. केज) हे सात जण ‘घर पाडून रस्ता का देत नाहीस’, या कारणावरून त्रास देत होते. त्यांच्याकडून होत असलेल्या शिवीगाळसह त्रासाला व खोट्या तक्रारींचा मानसिक त्रास झाल्याने रामहरी गायकवाड यांनी २५ नोव्हेंबर रोजी विष प्राशन करून आत्महत्या केली.
गुन्हा दाखल
मृताचा मुलगा संतोष रामहरी गायकवाड यांच्या तक्रारीवरून बाळासाहेब गायकवाड, विजयमाला गायकवाड, महेश गायकवाड, सचिन गायकवाड, प्रियंका ऊर्फ दीदी चाळक, रामचंद्र चाळक, नवनाथ चाळक या सात जणांविरोधात केज पोलिसांत गुन्हा दाखल झाला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक आनंद शिंदे करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.