file photo 
मराठवाडा

उद्धव साहेब, कापूस खरेदी सुरू करा; शेतकरी महिलेची साद

कैलास चव्हाण

परभणी : परभणी जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या घरात मोठ्या प्रमाणाक कापूस शिल्लक असून खरेदीअभावी घरात असल्याने धोकादायक आहे. तसेच आर्थिक गरजांसाठी कापूस विक्री आवश्यक असल्याने कापूस खरेदी सुरू करण्याची मागणी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ई-मेलद्वारे मांडाखळी (ता. परभणी) येथील शेतकरी महिलेने केली असून आता मुख्यमंत्री काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.
कोरोनामुळे लॉकडाउन झाल्यानंतर परभणी जिल्ह्यात शेतमालाची खरेदी बंद झाली आहे. अजूनही अनेक शेतकऱ्यांकडे कापूस, तूर आहे. सीसीआय, कापूस पणन महासंघ, तसेच खासगी व्यापारी यांनी खरेदी बंद केल्याने अजूनही हजारो क्विटंल कापूस शेतकऱ्यांच्या घरात आहे. कापूस विक्री झाला तर आर्थिक अडचण दूर होणार आहे. तसेच कापूस घरात ठेवणे धोक्याचे आहे. त्यामुळे शेतकरी कापूस खरेदी सुरू करण्याची मागणी करू लागले आहेत. त्यासाठी मांडाखळी येथील महिला शेतकरी  सत्यभामा प्रभाकर लोहट यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाककरे यांनी ई-मेल पाठवून आपली व्यथा सांगितली आहे. लॉकडाउनच्या काळात मुख्यमंत्र्यांनी अनेक शेतकऱ्यांच्या अडचणी केवळ एका संदेशात दूर केल्या आहेत. त्यामुळे आता लोहट यांच्या ई-मेलचची कितपत दखल घेतली जाते, त्याकडे लक्ष लागले आहे.


 काय लिहिले आहे मेलमध्ये 
मी सत्यभामा प्रभाकर लोहट (रा. मांडाखळी, ता. जि. परभणी) येथील शेतकरी असून माझा संपूर्ण कापूस अजून घरी आहे. कोरोनामुळे सध्याची परिस्थिती गंभीर आहे. आपण आणि मा. राजेशजी टोपे आपणच आमची आशा आहात. या संकटसमयी आम्ही तुमच्या सोबत आहोत. नियमांचं पालन करत आहोत. परंतु, शेतकऱ्यांची पण परिस्थिती गंभीर आहे. वर्षभर राबराब राबून, खर्च करून घरात आलेला कापूस अजूनही तसाच घरी आहे. बाकी इतर कडधान्य तरी घरी साठवता येईल. परंतु, कापूस घरी ठेवणे अत्यंत धोकादायक आहे. तसेच तो साठवतादेखील येत नाही. सध्या ऊन खूप तापत आहे व एखादी ठिणगी पण कापसाची राख करू शकते, हा विचारच फार त्रासदायक आहे. तेव्हा घरातील कापूस खरेदी व्हावा हीच आम्हा परभणी जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांची इच्छा आहे. कारण बऱ्याच दिवसांपासून कापूस खरेदी बंद आहे. माल जर घरी राहिला तर नवीन वर्षात बी- बियाणे, खत खरेदी करायचाही सवाल आहे. आम्हाला माहीत आहे, तुम्ही खूप मेहनतीने कोरोनाचा लढा लढत आहात, आम्ही मावळे पण तुमच्या सोबत आहोतच. परंतु, आमच्या कापसाच्या प्रश्नावरदेखील तुम्हीच आमची शेवटची आशा आहात. नक्कीच आपल्या निर्णयाच्या प्रतीक्षेत..... 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air Ambulance Crash: भीषण विमान दुर्घटना!,रांचीहून दिल्लीला निघालेली 'एअर अ‍ॅम्ब्यूलन्स' घनदाट जंगलात कोसळली

WI vs ZIM, T20 WC: वेस्ट इंडिजचा विजय अन् टीम इंडिया स्पर्धेबाहेर? झिम्बाब्वेविरुद्धच्या निकालाने सर्व गणित बिघडले, आता फक्त आणि फक्त...

Yavatmal News : जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्या एप्रिलमध्ये होणार; सीईओंचे गटविकास अधिकार्‍यांना पत्र

Congress spokesperson assaulted Video : काँग्रेस प्रवक्त्यास पुण्यात मारहाण!, प्रदेशाध्यक्ष सपकाळांनी ट्वीट केला घटनेचा व्हिडिओ

T20 WC, WI vs ZIM: ७ चौकार, ७ षटकार... वानखेडेवर हेटमायरचं वादळ; झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना झोडपत विंडीजसाठी रचला वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT