फोटो 
मराठवाडा

शासकीय धान्य खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ

कृष्णा जोमेगावकर

नांदेड : खुल्या बाजारात शेतीमालाचे दर वाढल्याने शेतकऱ्यांनी शासकीय धान्य खरेदी केंद्राकडे पाठ फिरविली आहे. जिल्हा मार्केटींग फेडरेशन तसेच शेतकरी उत्पादक कंपनीकडून जिल्ह्यात दहा ठिकाणी हमी दरानुसार खरेदी केंद्र सुरू करण्यात आली होती. यात शेतीमाल विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणीही तुरळक प्रमाणात झाली आहे.


बाजारात शेतीमालाचे दर कोसळल्यानंतर शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी राज्य सरकारने किमान हमी दरानुसार धान्य खरेदी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. या केंद्रावर शेतकऱ्यांना आलेला कटू अनुभव तसेच बाजारात हमीभावापेक्षा चांगला दर मिळत असल्याने शेतकरी खुल्या बाजारात धान्य विकत आहेत.


जिल्ह्यातील मार्केटींग फेडरेशनकडून सुरू केलेल्या मुखेड, अर्धापूर, हदगाव, किनवट या खरेदी केंद्रासह शेतकरी उत्पादक कंपनीने सुरु केलेल्या धानोरा (धर्माबाद), करडखेड (देगलूर), डोणगाव (बिलोली), नारनाळी (कंधार), बरबडा (नायगाव), किनवट या खरेदी केंद्रात एकही शेतकरी आला नाही. यामुळे हे खरेदी केंद्र ओस पडली आहेत. खुल्या बाजारात भाव नसल्याने या केंद्रावर धान्य विक्रीसाठी शेतकऱ्यांची गर्दी होत असते. परंतु, यंदा उलटे चित्र पहायला मिळाले आहे.

या केंद्रात सोयाबीन व मुग विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणीची मुदत (ता.१५) जानेवारीपर्यंत वाढविली आहे. परंतु, याकडे शेतकऱ्यांचा कल नसल्यामुळे ऑनलाइन नोंदणीही तुरळक प्रमाणात झाली आहे.


जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न समित्यांनी या हमी भावाने धान्य खेरदी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच हमी भावाने शेतकऱ्यांकडून धान्य खरेदीसाठी ही केंद्रे सुरू झाली होती. परंतु, यंदा अतिवृष्टीमुळे शेतीमालाचे उत्पादन कमी झाले. त्यामुळे यंदा धान्याचे कमी उत्पादन झाल्याने बाजारपेठेत पुरवठा कमी झाला. त्यामुळे धान्याच्या किंमती घसरल्या नाहीत. हमी भावाच्या तुलनेत सोयाबीनला क्विंटलमागे चारशे ते पाचशे रुपये जास्त दर मिळत आहे. त्यामुळे हमी भाव केंद्राकडे एकही शेतकरी फिरकला नाही. त्यामुळे यंदा हमी भाव केंद्राला धान्यच मिळू शकले नाही.

एमएसपीनुसार शेतीमालाचे दर


केंद्र शासनाने यंदा खरीप हंगामातील शेतीमालासाठी किमान हमी दर जाहीर केले. यात ज्वारी संकरितसाठी क्विंटलला दोन हजार ५५०, मालदांडी ज्वारीसाठी क्विंटलला दोन हजार ५७०, तुरीसाठी पाच हजार ८००, सोयाबीनसाठी क्विंटलला तीन हजार ७१०, उडदासाठी क्विंटलला पाच हजार ७००, मुगासाठी क्विंटलला सात हजार ५० रूपये हमी भाव सरकारने निश्चित केला होता.

यंदा खुल्या बाजारात शेतीमालाचे दर वाढले आहेत. यामुळे शासकीय धान्य खरेदी केंद्राकडे शेतीमाल आला नाही. ज्यावेळी बाजारात शेतीमालाचे दर पडतात त्यावेळी शासन हस्तक्षेप करुन हमी दरानुसार शेतीमाल खरेदी करते. या वेळी शेतीमाल मिळाला नाही तरी चालेल परंतु शेतकऱ्यांना चांगला दर मिळल्याचे समाधान आहे.


एस. एस. पाटील, जिल्हा मार्केटींक अधिकारी, नांदेड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: १९९४ चा जीआर नेमका काय आहे? मराठा समाज आरक्षणाबाहेर राहिला, कारण...

Pachod News : चौकशीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या धमकीने घाबरलेल्या शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन संपविले जीवन

Latest Marathi News Updates: भाजपमध्ये घराणेशाही नाही- देवेंद्र फडणवीस

कोकणातलं तुम्हाला काय आवडलं? दिलीप प्रभावळकर म्हणाले, 'ते पाहून मीच चकीत झालो कारण...

BCCI ची अब्जावधींची कमाई होते तरी कशी? भारताच्या तुलनेत पाकिस्तान क्रिकेट बोर्ड किती कमावतो पैसा, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT