photo 
मराठवाडा

शेतकऱ्यांना सौरपंप योजनेचा लाभ

नवनाथ येवले

नांदेड: पारंपरिक ऊर्जा स्रोत वापरून शेतीला शाश्वत पाणी पुरवठा करता यावा, या उद्देशाने शासन स्तरावरुन महाऊर्जा परिवर्तन अभियान राबविण्यात येत आहे. मागणीच्या तुलनेत रोज अपुरा पडणारा ऊर्जास्त्रोत यामुळे शाश्वत, पारंपरिक स्रोतपासून वीजनिर्मिती करून तिचा शेती वापरासाठी अटल सौरपंप योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सौरपंप वाटप करण्यात येत आहेत. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील पंधरा शेतकऱ्यांना सवलतीमध्ये ३६ लाख रुपयांचे सौरपंप वाटप करण्यात आले आहेत.

राज्य ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत जिल्ह्यातील पाच गावांच्या निवडी करण्यात आल्या आहेत. योजनेच्या अंमलबजावणीसाठी नियुक्त ग्राम परिवर्तकांच्या माध्यमातून यथील ७५ शेतकऱ्यांनी लातुरच्या विभागीय मुख्य प्रबंधक महाउर्जा कार्यालयाकडे सौरपंपासाठी मागणी प्रस्ताव सादर केले होते. लाभर्थी शेतकऱ्यांना सौरपंप वापरा संदर्भात प्रशिक्षण देण्यात आले. पहिल्या टप्यात जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील हंगरगा (प. क.) येथील सात व फुटकलवाडी येथील चार, कंधार तालुक्यातील राम नाईक तांडा येथील चार असे एकूण पंधरा शेतकऱ्यांना सौरपंप वाटप करण्यात आले.

हेही वाचा...‘नाबार्ड’चा चार हजार आठशे कोटींचा आराखडा ​
लाभार्थी शेतकऱ्यांशी समन्वय   
लाभार्थी शेतकऱ्यांना योजनेंतर्गत पाच एचपी क्षमतेचे सौरऊर्जा पंपाचा लाभ देण्यात आला. अभियानातील गरजू शेतकऱ्यांनी ग्राम परिवर्तकांसोबत महाऊर्जा कार्यालय लातूर येथे मार्गदर्शन घेऊन अर्ज दाखल केले. विभागीय कार्यालय लातूर (एमईडीए) मुख्य प्रबंधक देविदास कुलकर्णी व सहकारी सुजित बोरकर, प्रबंध लातूर आणि नांदेड येथून निर्भय कानवटे, पूजा धुमाळ, शुभम पिसाळ, सतीश देगावकर, पल्लवी शेळके, सोमनाथ चाटे, प्रेरणा नलावडे, ऋषिकेश जाधव, महादेव पाटील व कल्याण निलंगेकर यांनी योजनेच्या अंमलबजावणीसाठी शेतकऱ्यांशी समन्वय साधला.

योजनेचे निकष
किमान दोन हेक्टर क्षेत्र, शाश्वत पाणीपुरवठ्याचे स्त्रोत (सिंचन विहीर), पाणीपुरवठ्याच्या स्त्रोतासाठी विजजोडणी नसावी असे अल्पभुधारक शेतकरी योजनेस पात्र राहतील. योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पाच एचपी क्षमतेचे पंप वाटप करण्यात येतात. सौर पंपाच्या एकून मुल्यापैकी पाच टक्के रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांना भरावी लागते. 

येथे क्लिक करा... खेळणीतील नोटा देणारे भामटे कोठडीत ​
साठ शेतकऱ्यांची निवड
या योजनेंतर्गत पाच एचपीच्या सौरपंपाचे मूल्य २४ हजार असून जिल्ह्यातील एकूण पंधरा शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात योजनेचा लाभ मिळाला आहे. दरम्यान, महाऊर्जा अभियानांतर्गत जिल्ह्यातील एकूण साठ शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. योजनेच्या लाभासाठी योजनेच्या निकषांनुसार सौरपंपाच्या एकूण किमतीच्या पाच टक्के हिस्सा शेतकऱ्यांनी भरला आहे. अल्पभूधारक किमान दोन हेक्टर शेती व शाश्वत पाणीपुरवठा असणाऱ्या, यापूर्वी पारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा जोडणी नसणारे शेतकरी योजनेस पात्र आहेत. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I : श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम; टीम इंडियाचीही झाली नाचक्की... भारताला हरवणारा आयर्लंड ११ वा संघ...

IND vs IRE 1st T20I: भारतीय संघ का हरला? ११ सामन्यांची अपराजित मालिका खंडित; कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणतो ते वाचा...

Indian Navy selection: पंढरपूरचा सूर्यन मुकणे भारतीय नौदलात सब लेफ्टनंट; माढा-पंढरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

Illegal Sand Mining Action: आमदार प्रशांत बंब यांची अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई; दोन अवजड वाहने जप्त

हवाई प्रवास होणार महाग? एअरलाइन्स आर्थिक संकटात; ICRA चा मोठा इशारा, प्रवाशांना बसू शकतो फटका

SCROLL FOR NEXT