file photo 
मराठवाडा

लॉकडाऊनमध्येही शेतकरी आत्महत्या सुरुच

प्रल्हाद कांबळे

नांदेड : सततची नापीकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने वीष पीऊन आत्महत्या केली. ही घटना निळा (ता. लोहा) येथे ता. एक एप्रील रोजी घडली. 

लोहा तालुक्यातील निळा येथील शेतकरी समद सरवर सय्यद (वय ३८) यांच्या शेतात मागील काही वर्षापासून सतत नापीकी होत होती. त्यामुळे ते कर्जबाजारी झाले. शेतातील उत्पन्न घटल्याने त्यांनी काढलेल्या कर्जाची परतफेड करणे त्यांना जमत नव्हते. अखेर त्यांनी ता.एक एप्रील रोजी दुपारी दोनच्या सुमारास आपल्या घरी वीष पीऊन आत्महत्या केली. या प्रकरणाची माहिती सय्यद सादात सरवर यनी सोनखेड पोलिसांना दिली. यावरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तपास फौजदार श्री. परिहार करत आहेत. 

लॉकडाऊनमध्ये डाक विभागाची देशसेवा

घरपोच सेवा, गोरगरिबांना खरा आधार

नांदेड : बोधडी (ता. किनवट) येथील कोरोना योद्धा म्हणून ग्रामीण डाक सेवक हे लॉकडाउनमध्ये देखील ज्याचे हातावरचे पोट आहे असे गरीब, निराधार महिलांचे पेन्शनचे पैसे नागरिकांच्या दारा- दारात जाऊन वाटप करीत आहेत. 

विविध योजनांचे पैसे दारावर

सध्या पोस्ट विभागात जनधन योजनाचे खातेधारक महिलांच्या खात्यावर केंद्र व राज्य सरकार पैसे त्यांच्या खात्यावर जमा करीत आहेत. ग्रामीण भागात याचे भार ग्रामीण डाक सेवकांवर असून डाक विभागाने ग्राहकांसाठी सोशल डिस्टनस पाळत पैसे वाटप करत असल्याची गर्दी दिसून येत आहे.
सर्व जिल्ह्यात आॅटो, वाहन बंदी असल्याकारणाने ग्रामीण भागातील नागरिक, निराधार लाभार्थी, जेष्ठ नागरिक लाभार्थी, मातृत्व वंदना लाभार्थी, जनधन योजना लाभार्थी पैसे उचलण्याची मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असल्याचे चित्र दिसत असले तरी त्यामध्ये योग्य ते अंतर, ग्रहाकासाठी हॅन्ड वॉश, साबण ग्राहकांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या तसेच डाक कर्मचाऱ्यांना मास्क तोंडावर लावून नियमांचे पालन करताना दिसून आले.

डाक विभागाचे कौतुक

ग्रामीण भागातील व शहरी भागातील डाक कर्मचारी प्रत्येक नागरिकाच्या दारी जाऊन पैसे उचलण्याची सुविधा व देशसेवा या कोरोनाच्या महामारीत करीत असल्याने सर्वत्र पोस्ट कर्मचाऱ्यांचे व डाक विभागाचे कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AI युगात मोठी संधी, पण राष्ट्रीय सुरक्षेची आव्हानेही गंभीर... भारताचे माजी Deputy NSA पंकज सरन यांची AP Globale Digital ला खास मुलाखत

Business Idea: पावसाळ्यात कमाईची मोठी संधी! फक्त 5,000 रुपयांपासून सुरू करा हे 10 फायदेशीर व्यवसाय; कमी गुंतवणुकीत मोठी कमाई

Mumbai News: राज्यात पावसाचा हाहाकार! ६३ जणांचा मृत्यू, प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत; गिरीश महाजन यांची घोषणा

Palghar 10 Foot Python Rescue : रात्री 10 वाजता घरात शिरला 15 किलो वजनाचा तब्बल 10 फुटांचा अजगर! गावकऱ्यांची उडाली झोप, पुढं काय घडलं?

पाकिस्तानी गँगस्टरकडून नागपूरच्या युवकांना फुस; १० जणांना एटीएसने घेतलं ताब्यात, कसा केला जात होता संपर्क?

SCROLL FOR NEXT