Farmers facing difficulties in getting crop loans from Maharashtra Bank Pachod Paithan Marathi news  
मराठवाडा

Crop Loan: वर्षभरापासून शेतकरी पिककर्जाच्या प्रतिक्षेत; हजारो फाईली धूळखात पडून

खरीप हंगाम डोक्यावर येऊन ठेपल्याने शासनाकडून सर्वत्र बँकाना मागेल त्या शेतकऱ्यास जिल्हाधिकाऱ्यांद्वारे पीककर्ज देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

हबीबखान पठाण

पाचोड : गेल्या वर्षभरा पासून शेकडो शेतकरी पिककर्जासाठी महाराष्ट्र बँकेच्या स्थानिक शाखेपासून विभागिय कार्यालयापर्यंत उंबरठे झिजवत आहे. शेतकऱ्यांनी कर्जासाठी प्रस्ताव दाखल करून वर्ष होत आले तरी अद्याप महाराष्ट्र बँकेने वर्षभरात प्रस्तावावरील धूळ झटकण्याची तसदी न घेतल्याने स्थानिक पाचोड (ता.पैठण) शाखेपासून छत्रपती संभाजीनगरच्या विभागिय कार्यालयापर्यंत शेतकऱ्यांच्या नशीबी अवहेलना येऊन त्यांची परवड होत असल्याचे चित्र पाहवयास मिळते.

खरीप हंगाम डोक्यावर येऊन ठेपल्याने शासनाकडून सर्वत्र बँकाना मागेल त्या शेतकऱ्यास जिल्हाधिकाऱ्यांद्वारे पीककर्ज देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राष्ट्रीय कृत बँकांद्वारे शेतीसाठी केवळ तीन टक्के दराने पीककर्ज वाटपाचा शासनाने नियम घातल्याने शेतकऱ्यांचा राष्ट्रीयकृत बँकेकडे कर्ज मागणीचा ओघ अधिक आहे. मात्र बँकेच्या अधिकाऱ्याद्वारे शेतकऱ्याच्या नशिबी अवहेलना येऊन त्यांची स्थानिक शाखेसह विभागिय कार्यालयात परवड होत आहे. कर्ज देणे तर सोडा साधे शेतकऱ्यांना अधिकाऱ्याची भेट टाळण्यात येत असल्याचा संतापजनक प्रकार महाराष्ट्र बँकेच्या विभागिय कार्यालयात अनुभवयास मिळतो.

गतवर्षी खरिप, रब्बीसह बागायती पिक कर्जासाठी पाचोड (ता.पैठण) येथील महाराष्ट्र बॅकेच्या शाखेकडे शेतकऱ्यांनी प्रस्ताव दाखल केले. परंतु स्थानिक शाखाधिकाऱ्याला कर्जमंजुरीचे अधिकार नसल्याने स्थानिक शाखाधिकाऱ्याने कागदपत्रांची पडताळणी करून सदर पिककर्जाचे प्रस्ताव छत्रपती संभाजीनगर च्या विभागिय कार्यालयाकडे मंजूरीसाठी पाठवले. यांस वर्ष उलटत आले तरी विभागिय कार्यालयास कर्ज देणे व नाकारण्यासाठी वेळच मिळाला नसल्याने प्रस्तावावर धूळीचे थर साचले आहे.

यंदा तरी खरिप हंगामासाठी कर्ज मंजूर होईल म्हणून शेतकरी पाचोडच्या शाखेत जाऊन शाखाधिकाऱ्याशी भेटून त्यांची मनधरणी करीत आहे. परंतु कर्जमंजुरीचे शाखाधिका ऱ्यास अधिकार नसल्याचे सांगून त्यांना विभागिय कार्यालयाशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला जात आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी विभागिय कार्यालयात हेलपाटे मारत आहे, परंतु तेथे वरिष्ठ अधिकारी शेतकऱ्यांना संवाद व चर्चा करण्यापासून बँकेच्या गेटवरच अडवून आल्या पावली परत पाठवत आहे.

पाचोडच्या शाखेकडून विभागिय कार्यालयात संपर्क साधण्याचा सल्ला दिला जातो अन् विभागिय कार्यालयात वातानुकुलीत खोलीत बसलेले अधिकारी कर्ज मंजूर करणे तर लांब साधी भेट न करता त्यांना प्रवेशद्वारावरूनच माघारी पाठवत आहे. प्रदेशद्वारावर शेतकऱ्यांना सुरक्षारक्षक अडवतो व आवश्यक वाटल्यास मोबाईलवर कर्ज अधिकाऱ्याला प्रवेशद्वाराहू नच बोला म्हणून सांगीतले जाते. कितीही विनंती केली तरी वरिष्ठांशी भेट न करता आले पावली परत केले जाते. अपमानास्पद वागणूक देऊन आम्हांला वेळ नाही, कशाला आला, शाखेत संपर्क साधा म्हणून सल्ला दिला जातो. शाखेवाले विभागिय कार्यालयात पाठवतात तर विभागिय कार्यालयाचे अधिकारी भेट न घेता सुरक्षा रक्षकाद्वारे त्यांना शाखेत पाठवता. या पाठशिवणीच्या खेळाला शेतकरी वैतागले असून या बँकेकडून मर्जीतल्या व्यापारी, कर्जबुडव्या लोकांना कोट्यावधीचे कर्ज वाटून आपले उद्दिष्ट पूर्ण करतात व मुळ उद्देशाला हरताळ फासत आहे.

यासंबंधी शाखाप्रमुख रंगनाथ व्यवहारे म्हणाले, "शाखेचे कर्जमंजूरीचे अधिकार गोठविण्यात आल्याने केवळ आम्ही शेतकऱ्यांनी मागणी नोंदवून त्यांचे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास पाठवतो. त्यांच्या मंजूरीनंतरच शाखेकडून कर्ज दिले जाते."

"येथे हजारो प्रस्ताव पडून आहे. मुख्य कार्यालयात शेतकऱ्यांनी येण्याची आवश्यकता नाही. प्रवेशद्वारावर असलेले सुरक्षारक्षक त्यांच्या मोबाईलवरून चर्चा घडवून आणतात. शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कशासाठी भेटायचे" - पुजा गोपनारे (कर्जवितरण अधिकारी, विभागिय कार्यालय),

"स्थानिक शाखाधिकाऱ्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील विभागिय कार्यालयात जावून भेटण्याचा सल्ला दिल्याने तीन वेळा विभागिय कार्यालयात गेलो. मात्र सुरक्षा रक्षक वरिष्ठ अधिकाऱ्यास भेटू देत नाही. अभ्यागतांना भेटू न देण्याचे वरिष्ठांचे आदेश आहेत असे म्हणून मुख्य कार्यालयात आलेल्या शेतकऱ्याचे काहीएक न ऐकता परत पाठविले जाते. सर्वच अधिकार सुरक्षारक्षकाकडे असतील तर वरिष्ठ अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती कशासाठी ?" ताहेर पठाण (शेतकरी, थेरगाव,ता.पैठण),

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : - जाहीर केलेले ११६० कोटी देऊन शाळांना टप्पा वाढ द्यावी

Lalit Modi and Vijay Mallya : Video-ललित मोदी अन् विजय मल्ल्याचा लंडनमधील पार्टीतील मजा-मस्ती व्हिडिओ तुम्ही पाहिली का?

Libra Soulmate Match: तुळ राशीची 'सोलमेट' कोण? जाणून घ्या राशीगणनेनुसार

SCROLL FOR NEXT