सेलु, परभणी परिसरात पावसाची दडी
सेलु, परभणी परिसरात पावसाची दडी 
मराठवाडा

सेलूत पावसाने दडी मारल्याने शेतकरी हवालदिल

विलास शिंदे

सेलू ( जिल्हा परभणी ) : सेलू तालुक्यात पावसाने दडी दिल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. काही दिवसांपूर्वी पावसाच्या सरी बरसल्याने शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्याला सुरुवात केली होती. मागील पाच दिवसांपासून पाऊसच गायब झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

तालुक्यात मृग नक्षत्रातच पाऊसाने हजेरी लावल्याने शेतकर्‍यात आनंदाचे वातावरण पसरले होते. त्यामुळे यावर्षी पाऊस चांगलाच पडेल अशी आशा शेतकर्‍यांना वाटू लागली. त्यामुळे शेतकर्‍यांनी महागडे बी- बीयाणे विकत घेवुन खरिपाच्या पेरण्या उरकल्या होत्या. यावर्षीच्या खरीप हंगामातील सुरुवातीलाच मोसमी पावसाने धडाकेबाज हजेरी लावून अवघ्या काही वेळेतच पाण्याचं दुर्भिक्ष दूर करत. छोटे- मोठे नाले, ओढे, तलाव वाहते करुन सोडले.

हेही वाचा - बेरोजगार युवकांना नोकरीचे आमिष दाखवून करोडो रुपये लुटणाऱ्या टोळीला नांदेड, मुंबई, दिल्ली आणि लखनऊ या भागातून अटक करुन त्यांच्याकडून विस लाखाचा मुद्देमाल जप्त. नांदेड परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांनी सोमवारी (ता. २१) सायंकाळी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

मान्सूनच्या पावसाची जोरदार हजेरी पाहून अधिकांश शेतकऱ्यांनी पेरण्या उरकून घेण्याला प्रथम प्राधान्य दिले. परंतु मागील पाच दिवसांपासून सेलू तालुक्यातील पाचही महसूल मंडळात पावसाने दडी दिली. तसेच उन्हाचा पारा सातत्याने वाढत असल्याने मातीत बी- बियाणे टाकून बसलेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे. एक तर या वर्षी खत, बी बियाणांच्या भावात विक्रमी वाढ झाली आहे. त्यात सुरुवातीलाच पाऊस धोधो बरसल्याने धूळपेरणी करुन बसलेल्या शेतकऱ्यांचे बी-बियाणे मातीतच दडपले गेले. आणि उशिरा पेरणी केलेल्या शेतामध्ये पावसाने उघडीप दिल्याने अंकुर फुटण्या आधीच बियाणे करपून जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

बेजबाबदार नोकरशाहीच्या हलगर्जीपणामुळे पिक विमापासून वंचित राहिलेल्या सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांना याही वर्षी निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या वर्षी लॉकडाउनमुळे इतर पिकांना अपेक्षित भाव मिळू शकला नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती फारसे उत्पन्न लागले नाही. यावर्षी सुरुवातीला दमदार झालेल्या पावसाने आता ऐन उमेदीच्या काळात दडी दिल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली असून पेरण्या आटोपलेल्या शेतकऱ्यांचे आभाळाकडे डोळे लागले आहे. एक- दोन दिवसात अपेक्षित पाऊस झाला नाही तर निश्चितच तालुक्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट निर्माण होते की काय? असा प्रश्न तालुक्यातील शेतकर्‍यांना पडला आहे.

खरिपाची धन जमिनीच्यावर निघालीत. पाऊस मात्र गायब झाला. धन वाढीसाठी पाऊसाची नितांत गरज आहे.

- अशोकअप्पा वाडकर, शेतकरी, देऊळगाव (गात), ता. सेलू जि. परभणी

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. रितेश-जेनेलिया देशमुखांनी बजावला मतदानाचा हक्क

Satara Lok Sabha : साताऱ्याचा खासदार कोण होणार? उमेदवारांचे भवितव्य होणार आज यंत्रात बंद

Met Gala 2024 : बावनकशी सौंदर्य ; मेट गालाला आलियाच्या लूकने वेधलं लक्ष... 'हे' आहे तिच्या खास साडीच वैशिष्ट्य

Latest Marathi News Live Update : महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी PM मोदी आज बीड दौऱ्यावर

Sunita Williams: सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी तुर्तास स्थगित; या कारणासाठी मोहीम पुढे ढकलली

SCROLL FOR NEXT