Jalna News  
मराठवाडा

Jalna News : अनुदानातून वगळल्याने वडीगोद्रीत शासनाचा निषेध; शासन निर्णयाची केली होळी

सप्टेंबर महिण्यात जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळांमध्ये मुसळधार अतिवृष्टी होऊन व नदी नाल्याना पाणी आल्याने शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे व फळबांगाचे नुकसान झाले होते.

दिलीप दखने

वडीगोद्री ता. 5 ( बातमीदार) : वडीगोद्री सह जालना जिल्हात माहे सप्टेंबर महिन्यात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे शेतातील पीकांचे नुकसान झाले होते शासनाने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकासाठी अतिवृष्टी अनुदान देण्याचा निर्णय घेतला. मात्र अतिवृष्टीच्या अनुदानातून जालना जिल्ह्याला वगळण्यात आले, याच्या निषेधार्थ वडीगोद्री (ता. अंबड) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने नुकसानग्रस्त पिकाच्या बांधावर शनिवार ता. 5 रोजी शासन निर्णयाची होळी करत निषेध व्यक्त करण्यात आला.

या विषय माहिती असी कि, सप्टेंबर महिण्यात जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळांमध्ये मुसळधार अतिवृष्टी होऊन व नदी नाल्याना पाणी आल्याने शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे व फळबांगाचे नुकसान झाले होते. शेतातील डाळिंब, मोसंबी व द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झालेल्या असताना शासनाच्या अनुदानापासून जालना जिल्हा वगळण्यात आला यामुळे जिल्ह्यातील शेतकरी अतिवृष्टी अनुदानापासून वंचित राहीले आहेत.

शुक्रवार ता. 4 ऑक्टोंबर महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयात 997 कोटी रुपयांची मदत अतिवृष्टी व पूरग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात आली. मात्र यात जालना जिल्ह्याचा समावेश नसल्याने शेतकरी संताप व्यक्त केला आहे. वडीगोद्री येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने नुकसानग्रस्त शेत पिकांच्या बांधावर या शासन निर्णयाची होळी करत सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. या वेळी स्वाभीमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष सुरेश काळे, सुनील गायकवाड, बप्पासाहेब काळे,अंकुश तारख, बाबासाहेब दखणे, नारायण डहाळे,प्रकाश सुरासे,मुकेश डूचे आदींची उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT