file photo 
मराठवाडा

शेतकऱ्यांनी कर्ज खाते ‘आधार’शी जोडावी

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी संपुर्णत: आधार क्रमांक जोडलेल्या बँक खात्याशी संबंधित असल्याने जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी बँकेमधील आपले कर्ज खाते आधार क्रमांकाशी जोडलेले असल्याची खात्री करावी. व ज्या शेतकऱ्यांचे बँक कर्ज खाते आधार क्रमांकाशी संलग्न नाहीत अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर बँकेशी संपर्क करुन आपले आधार क्रमांक बँक खात्याशी जोडून घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे.

नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यामुळे मागील काही वर्षात शेती निगडीत कर्जाची मुदतीत परतफेड होऊ शकली नाही. त्यामुळे शेतकरी थकबाकीदार झाल्यामुळे कर्जाच्या चक्रात अडकलेला आहे आणि त्यांना शेती कामांकरिता नव्याने पीक कर्ज घेण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. परिणामी सन २०१९- २० मध्ये अल्प मुदत पीक कर्ज वाटप अंत्यत असमाधानकारक आहे. ही वस्तुस्थिती विचारात घेता शासनाने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ घोषीत केली आहे.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत ज्या शेतकऱ्यांकडील ता. एक एप्रिल २०१५ ते ता. ३१ मार्च२०१९ पर्यंत उचल केलेल्या एक किंवा एकापेक्षा जास्त ज्या कर्ज खात्यात अल्पमुदत पीक कर्जाची ता. ३० सप्टेंबर २०१९ रोजी मुद्दल व व्याजासह थकीत असलेली व परतफेड न झालेली रक्कम दोन लाखापर्यंत आहे, अशा शेतकऱ्यांचे अल्प / अत्यल्प भूधारक याप्रकारे जमीन धारणेचे क्षेत्र विचारात न घेता, त्यांच्या कर्जखात्यात दोन लाखापर्यंत पर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येईल.

वैयक्तिक शेतकरी हा निकष 
या कर्जमुक्ती योजनेसाठी पुढील प्रमाणे निकष निश्चित करण्यात आलेले आहेत. कर्जमुक्तीचा लाभ देत असताना वैयक्तिक शेतकरी हा निकष गृहीत धरण्यात येईल. या योजनेसाठी केवळ राष्ट्रीयकृत बँका, व्यापारी बँका, ग्रामीण बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी शेतकऱ्यांना दिलेले, तसेच, राष्ट्रीयकृत बँका व व्यापारी बँका विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत शेतकऱ्यांना दिलेले अल्पमुदत पीक कर्ज व अल्पमुदत पीक कर्जाचे पुनर्गठीत / फेर पुनर्गठित कर्ज विचारात घेण्यात येईल.

२५ हजापेक्षा उत्पन्न जास्त असणारे वगळले
या कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळण्यास खालील व्यक्ती पात्र असणार नाहीत. महाराष्ट्र राज्यातील आजी , माजी मंत्री, राज्यमंत्री, आजी, माजी लोकसभा- राज्यसभा सदस्य, आजी, माजी विधानसभा -विधान परिषद सदस्य. केंद्र व राज्य शासनाचे सर्व अधिकारी, कर्मचारी (एकत्रित मासिक वेतन २५ हजार रुपया पेक्षा जास्त असणारे मात्र चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळून) राज्य सार्वजनिक उपक्रम (उदा. महावितरण एस. टी. महामंडळ इ.) व अनुदानित संस्था यांचे अधिकारी व  कर्मचारी (एकत्रित मासिक वेतन २५ हजार रुपया पेक्षा जास्त असणारे). शेतीबाह्य उत्पन्नातून आयकर भरणाऱ्या व्यक्ती. निवृत्तीवेतनधारक व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्तीवेतन २५ हजार रुपया पेक्षा जास्त आहे. (माजी सैनिक वगळून). कृषी उत्पन्न बाजार समिती, सहकारी साखर कारखाना, सहकारी सूतगिरणी, नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व सहकारी दूध संघ यांचे अधिकारी एकत्रित मासिक वेतन २५ हजार रुपया पेक्षा जास्त असणारे) व पदाधिकारी (अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळ). अशी माहिती प्रवीण फडणीस जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नांदेड यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT