रोहिलागड : पावसाअभावी सुकू लागलेले कपाशीचे पीक. 
मराठवाडा

दमदार पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा

वसंत काळवणे

रोहिलागड(जि. जालना) - अंबड तालुक्‍यातील रोहिलागडसह नांदी, धनगरपिंपळगाव, किनगाव, कौचलवाडी, निहालसिंगवाडी, माहेरभायगाव, देशगव्हाण, बदापूर, लोणारभायगाव, किनगाववाडी परिसरात पावसाने दहा ते पंधरा दिवसांपासून दडी मारल्याने जोमात आलेली पिके कोमात जात आहेत. 

बाजरीला दाणे भरण्यासाठी याच वेळी पाण्याची नितांत गरज असते; मात्र सध्या पावसाने उघड दिल्याने पिके सुकू लागली आहेत; तसेच कापूस पिकाला देखील खताची पेरणी केल्यावर पाण्याची गरज असते. परिणामी पातेगळ होण्याची भीती असते. ठिबक सिंचन असूनही विहिरीत पाणी नसल्याने पिके सुकू लागली आहेत.

सध्याच्या स्थितीत शेतकऱ्यांचा शेतीवर पूर्ण खर्च झालेला असून कुठेही नाले, नद्या, ओढ्यात पाणी साचलेले नाही. यामुळे विहिरींच्या पाणीपातळीत देखील वाढ झाली नसल्याने पिकांना पाणी देखील देऊ शकत नाही. यामुळे शेतकरी सर्वत्र दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. 

पिकांना पाण्याची गरज असताना विहिरीत पाणी नसल्याने दे? शकत नाही. यामुळे पिकांना मोठा फटका बसत आहे. उत्पन्नात मोठी घट होण्याची शक्‍यता आहे. 
- अंकुश भोजने, 
शेतकरी किनगाव  

----- 
सध्या बाजरी पीक यावर्षी सर्वत्र जोमदार आलेले होते. मात्र, ऐनवेळी पावसाने दडी मारल्यामुळे पिके वाया जाण्याची भीती आहे. 
- ज्ञानेश्वर फाटे, 
शेतकरी, किनगाव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT