Accident News sakal
मराठवाडा

Accident : अज्ञात वाहनाच्या धडकेने पितापुत्र जागीच ठार; अज्ञात वाहनाविरुद्ध गुन्हा

लग्नाहून दुचाकीने गावी परतणाऱ्या पितापुत्रास भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना धूळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दाभरूळ (ता. पैठण) जवळ घडली.

हबीबखान पठाण

पाचोड - लग्नाहून दुचाकीने गावी परतणाऱ्या पितापुत्रास भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना धूळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दाभरूळ (ता. पैठण) जवळ घडली असून पाचोड (ता. पैठण) पोलिसांनी गुरुवारी (ता. १६) अज्ञात वाहनाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

यासंबंधी अधिक माहिती अशी, रांजणगाव शेणपुंजी (ता.गंगापुर) येथील सलीम बादशाहा सय्यद व मुलगा अनिस सलीम सय्यद हे बुधवारी (ता. १५) यामाहा मोटार सायकल (क्र. एम एच - २०एफ जे- ८३११) ने राणी उंचेगाव (ता. अंबड जि. जालना) येथे लग्नासाठी गेले होते, ते लग्नाहून परत येत असताना संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास रोहीलगड फाट्याहून वळण घेत असताना दाभरूळ फाट्यानजीक भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीस जोराची धडक दिल्याने ते जागीच ठार झाले.

त्यांना उपस्थितांनी पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता वैद्यकिय अधिकारी डॉ. विक्रम ठाकरे यांनी त्यांस तपासून मृत घोषित केले. धडक देणाऱ्या वाहनचालकाने वाहन थांबवून कोणतीही मदत न करता व अपघा ताची पोलिसांना खबर न देता वाहनासह घटनास्थळाहून पळ काढला.

अज्ञात व्यक्तीने मृत सलीम सय्यद यांच्या मोबाईलवरून त्यांच्या घरी या घटनेची कल्पना दिली. ही माहिती मिळताच दुसरा मुलगा अलीम सलीम सय्यद यांने पाचोड येथे धाव घेऊन उत्तरणीय तपासणीनंतर मृतदेह ताब्यात घेऊन गावी दफनविधी केला व गुरुवारी (ता.१६) पाचोड पोलीसात तक्रार दाखल केली. सदर तक्रारीवरून पाचोड पोलिसांनी अज्ञात वाहनाविरुद्ध विविध कलमाखाली गुन्हा दाखल केला .

या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

करदात्यांसाठी गूडन्यूज! ITR दाखल करण्यासाठी १ दिवस मुदतवाढ, मध्यरात्री निर्णय; आजच भरा

Latest Marathi News Updates : विजय वडेट्टीवार आणि नाना पटोलेंनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट

Kantara Chapter 1: ‘कांतारा-चॅप्टर १’ मध्ये दिलजीत दोसांझची एंट्री

Tokyo World Athletics 2025: जागतिक ॲथलेटिक्समध्ये तेजस शिरसेची उपांत्य फेरी थोडक्यात हुकली

Kolhapur Bhakt Niwas Scam : भक्त निवास म्हणून दाखवल्या शाळेच्या खोल्या, निधीचा गैरवापर; माहितीच्या अधिकारात धक्कादायक माहिती, मुख्य सूत्रधार कोण?

SCROLL FOR NEXT