Arun Aute and Suraj Aute Sakal
मराठवाडा

भाजीपाला विक्रीसाठी जाणाऱ्या बाप-लेकाचा कारच्या धडकेत मृत्यू

बारामती-पैठण मार्गावर खाकाळवाडी शिवारात भाजीपाला विक्रीसाठी दुचाकीवरून जाणाऱ्या बाप-लेकाचा समोरुन भरधाव आलेल्या कारने दिलेल्या धडकेत जागीच मृत्यू झाला.

सकाळ वृत्तसेवा

बारामती-पैठण मार्गावर खाकाळवाडी शिवारात भाजीपाला विक्रीसाठी दुचाकीवरून जाणाऱ्या बाप-लेकाचा समोरुन भरधाव आलेल्या कारने दिलेल्या धडकेत जागीच मृत्यू झाला.

आष्टी (जि. बीड) : तालुक्यातील बारामती-पैठण मार्गावर खाकाळवाडी शिवारात भाजीपाला विक्रीसाठी दुचाकीवरून जाणाऱ्या बाप-लेकाचा समोरुन भरधाव आलेल्या कारने दिलेल्या धडकेत जागीच मृत्यू झाला. शुक्रवारी (ता. दोन) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. अरूण बापूराव औटे (वय ५४ वर्षे) व सुरज अरूण औटे (वय २४ वर्षे) अशी मृतांची नावे आहेत.

तालुक्यातील नांदा येथील अरूण बापूराव औटे व सुरज अरूण औटे हे शेतकरी पितापुत्र दोघेही शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे शेतातील भाजीपाला विक्रीसाठी नांद्यावरुन कड्याकडे दुचाकीवरून येत होते. खाकाळवाडी शिवारात कड्याकडून मिरजगावकडे जाणार्या कारने (क्रमांक एम.एच.जीयु-९९६७) त्यांच्या दुचाकीला समोरासमोर जोराची धडक झाली.

या भीषण अपघातात दुचाकीवरील बाप-लेकाचा गंभीर दुखापत होऊन जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच कडा पोलिस चौकीच्या कर्मचा-यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदत केली. सर्वसामान्य शेतकरी कुटूंबातील दोघाही कर्त्या पितापूत्राचा अपघातात दुर्देवी मृत्यू झाल्याने औटे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT