मराठवाडा

चिमुकल्या मुलासह पित्याची रेल्वेखाली उडी

सकाळ वृत्तसेवा

जालना -  तालुक्‍यातील सिरसगाव शिवारात एक पित्याने आपल्या सहा वर्षांच्या मुलासह रेल्वे खाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (ता.28) सकाळी उघडकीस आली.सय्यद अनिस सय्यद सुलताना (वय 30), सय्यद अरफान सय्यद अनिस (वय 6 दोघे रा. रेवलगाव, ता. परतूर, जि. जालना) असे या मृतांची नावे आहेत.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परतूर तालुक्‍यातील रेवलगाव येथील सय्यद अनिस सय्यद सुलताना हे आपल्या नातेवाइकांकडे आले होते. शनिवारी (ता.28) सकाळी त्यांनी आपल्या सहा वर्षांच्या सय्यद अरफान या मुलासह सिरसगाव शिवारात रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. दरम्यान ही आत्महत्या घरगुती करणामुळे झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.


या घटनेची माहिती मिळताच चंदनझिरा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. जिल्हा शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणी झाल्यानंतर दोन्ही मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha : पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा ; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार,भाजपचा दावा

Apple Bug : अ‍ॅपलच्या यूजर्सना भेडसावतेय वेगळीच समस्या; रिसेट करावा लागतोय Apple ID पासवर्ड

लग्नाच्या दिवशी नवऱ्या मुलाने केली मोठी चूक; नवरीमुलीने थेट लग्न मोडलं

Viral Video: शिक्षिकेची गुंडागर्दी! शेजारच्या घरात घुसून गोंधळ, लहान मुलासह तीन जखमी.. व्हिडिओ व्हायरल

International Labour Day : राजीनाम्यानंतर नोटीस कालावधी पूर्ण करणे बंधनकारक आहे का? काय सांगतो नियम

SCROLL FOR NEXT