Father Make Electric Cycle For Daughter Sakal
मराठवाडा

Father Make Electric Cycle For Daughter : लेकीचे कष्ट टाळण्यासाठी बापाने बनविली इलेक्ट्रिक सायकल

Unique gift for daughter Electric cycle : किनवट तालुक्यातील भाग्येश जाधव यांचे ‘इंडियन जुगाड’; केवळ सहा हजारांचा खर्च

सकाळ वृत्तसेवा

- प्रमोद जाधव

ईस्लापूर : ‘लाडक्या लेकी’ला शिकवायचेच, ही बापाची जिद्द. लेकीनं कधी तक्रार केली नाही; पण रोज आठ किलोमीटर सायकल चालवत मुलगी शाळेत ये-जा करीत असल्याचं पाहून बापाचं काळीज तीळ तीळ तुटायचं. टीव्ही, फ्रीज, पंखे आदींची दुरुस्ती करता करता तिच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, असा विचार बापाच्या मनात सदैव असायचा.

मग ‘इंडियन जुगाड’ करून बापानं लेकीसाठी चक्क सायकलीला इलेक्ट्रिकमध्ये रूपांतरित केले! केवळ सहा हजारांत तयार झालेली ही चार्जिंगवरील सायकल चालवत लेक आता शाळेला जाते अन् तिला बघून बापाचं मनही भरून येतं.

किनवट तालुक्यातील इस्लापूरजवळ कोल्हारी हे छोटेसे गाव आहे. येथील इलेक्ट्रिशियन भाग्येश जाधव यांनी मुलगी अंजलीच्या शिक्षणासाठी एक शक्कल लढवून सायकलीला टू-इन-वन बनविले. ही सायकल एकदा चार्जिंग केल्यावर दहा किलोमीटर धावते. अचानक चार्जिंग संपली की नेहमीसारखी ती पायडल मारूनही चालविता येते.

लेकीवरच्या प्रेमापोटी त्यांनी केलेला हा ‘भारतीय आविष्कार’ पाहण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील नागरिकही गर्दी करीत आहेत. भाग्येश जाधव यांच्याकडे पाच एकर शेती आहे. दरवर्षीच्या दुष्काळ व नापिकीमुळे शेतीतून पुरेसे उत्पन्न मिळत नाही.

त्यामुळे इतर गावांमध्ये कामासाठी जाऊन कूलर, फ्रीज, पंखे दुरुस्तीची कामे ते करतात. त्यांचा मुलगा इस्लापूर येथील शाळेत शिकतो. त्याला घरच्या परिस्थितीची आणि वडिलांच्या कष्टाची जाणीव आहे. म्हणूनच तो येथीलच एका खासगी डॉक्टरच्या दवाखान्यात महिनेवारीने काम करतो.

मुलीची शिकण्याची जिद्द पाहून जाधव त्यांनी तिला नेहमी पाठिंबा दिला. ती सध्या कोसमेठ येथील शाळेत इयत्ता दहावीत शिकते. तिला शाळेत सायकल मिळाली होती. कोल्हारापासून ते कोसमेठपर्यंत ती रोज आठ किलोमीटर सायकल चालविते. यात घरी आल्यानंतर ती रोज दमून जायची. याची खंत वडिलांना होती.

अशी बनविली सायकल

जाधव यांनी फवारणी पंपासाठी वापरल्या जाणाऱ्या १२-१२ व्होल्टच्या दोन मोटारी एकत्र केल्या. अशी २४ व्होल्टची मोटार सायकलच्या एका चाकाला लावली. दुसऱ्या चाकाला कॅरिअरच्या मागे वेल्डिंग करून बॅटरी जोडली. जवळच दुचाकीला ऑन-ऑफ स्विच जोडला. चार्जिंग केल्यावर स्विच ऑन केला की सायकल धावायला लागते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१३५च्या स्पीडनं स्विफ्टची ट्रकला मागून धडक, अख्खं कुटुंब संपलं; पाच जणांचा जागीच मृत्यू

Bay of Bengal Low Pressure Area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भाला पाऊस; हवामान विभागाचा अंदाज

बुमराला अचानक विश्रांती का? अफगाणिस्तान मालिकेपूर्वी BCCI चा मोठा मास्टरप्लॅन समोर!

Sugar Export Ban: निर्यात बंदीमुळे देशातील साखर उद्योगासमोर संकट: हर्षवर्धन पाटील यांची माहिती; आंतरराष्ट्रीय पातळीवर परिणाम होणार!

Premium|AI and Sustainability History : ‘एआय’ आणि शाश्वत विकास; पृथ्वी वाचवणारे अस्त्र की मानवी रोजगारावर कुऱ्हाड?

SCROLL FOR NEXT