Aurangabad Crime News esakal
मराठवाडा

Aurangabad Crime News: दोन मुलांकडून बापाचा खून

मद्यपी बापाच्या त्रासाला कंटाळूनच दोन मुलांनी मारहाण करून त्यांचा खून केल्याची घटना धोंदलगाव (ता. वैजापूर) येथील शेतवस्तीवर घडली.

सकाळ वृत्तसेवा

मद्यपी बापाच्या त्रासाला कंटाळूनच दोन मुलांनी मारहाण करून त्यांचा खून केल्याची घटना धोंदलगाव (ता. वैजापूर) येथील शेतवस्तीवर घडली.

वैजापूर - मद्यपी बापाच्या त्रासाला कंटाळूनच दोन मुलांनी मारहाण करून त्यांचा खून केल्याची घटना धोंदलगाव (ता. वैजापूर) येथील शेतवस्तीवर घडली. वैजापूर पोलिसांनी दोन्ही मुलांना अटक केली.

नारायण रुस्तम वाघ (वय ५०) असे मृताचे नाव आहे. शुभम वाघ (२२), विकास वाघ (२०) अशी पित्याचा खून करणाऱ्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नारायण वाघ हे पत्नी, दोन मुले व अन्य सदस्यांसह शेतवस्तीवर राहतात.

नारायण वाघ यांना दारूचे व्यसन असल्याने त्यांचे नेहमी कुटुंबीयांसोबत वाद होत असत. मंगळवारी (ता. ७) दुपारी दोन मुलांसोबत असाच त्यांचा वाद झाला.

परिसरातील काहींनी याबाबतची माहिती देताच पोलिस पाटील घटनास्थळी आल्यानंतर नारायण वाघ मृतावस्थेत दिसले. वैजापूर पोलिसांनी रात्री उशिरा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वैजापूरला हलविला. संशयित दोन्ही मुलांविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यांना अटक करण्यात आली आहे.

वडील नारायण वाघ हे नेहमीच घरातील सर्वच सदस्यांना त्रास, शिवीगाळ, मारहाण करायचे. त्यामुळे रागाच्या भरात डोक्यात दगड घालून, गजाने मारहाण करून त्यांचा खून केला, नंतर मृतदेहावर पेट्रोल टाकून जाळल्याची कबुली शुभम व विकास वाघ याने पोलिसांना दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: ट्रम्पच्या शस्त्रसंधीच्या निर्णयानंतर शेअर बाजार उसळला! सेन्सेक्स 2600 अंकांनी वाढला; कोणते शेअर्स फायद्यात?

IPL 2026, DC vs GT: गुजरातला कर्णधार गिलच्या कमबॅकची, तर दिल्लीला केएल राहुलच्या योगदानाची प्रतीक्षा; कशी असेल प्लेइंग-११

Bhondu Ashok Kharat : भोंदू अशोक खरात प्रकरणातील सोशल मीडियावरील 4500 लिंक नष्ट

'वीण दोघातली ही तुटेना' मालिकेची वेळ बदलली, १३ एप्रिलपासून दोन मालिकेच्या वेळेत मोठा बदल, दुसरी कोणती मालिका?

Latest Marathi News Live Update: राहुल गांधी यांनी मोहसिना किडवई यांना वाहिली श्रंद्धाजली

SCROLL FOR NEXT