मराठवाडा

औरंगाबाद - मुलाच्या मृत्यूप्रकरणी पित्याची न्यायालयात धाव 

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद - मशिदीत बेकायदा नळ लावल्याच्या व फळ विक्रेत्याला मारहाण झालेल्या अफवेने उसळलेल्या दंगलीत पोलिसांनी प्लास्टीक गोळ्यांनी केलेल्या गोळीबारात 17 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता. प्रकरणात मृत मुलाच्या वडीलांनी जिल्हा न्यायालयात फौजदारी अर्ज करुन संबंधितांवर गुन्हा नोंदविण्याची विनंती न्यायालयाकडे होती. अर्जावरील सुनावणीनंतर प्रधान जिल्हा न्यायाधीश श्रीपाद टेकाळे यांनी मुलाच्या मृत्यूप्रकरणी संबंधितांवर गुन्हा नोंदवून त्याचा स्वतंत्र तपास करावा, असे आदेश दिले आहेत. 

11 मे 2018 रोजी पहाटे दोन जातींमध्ये तणाव निर्माण होऊन मोतीकारंजा, शहागंज व जिन्सी परिसरात दंगल उसळली होती. संतप्त जमावाने पोलिसांवर हल्ला चढवून तीन अधिकाऱ्यांना गंभीर जखमी केले. जमावाने पोलिसांच्या वाहनांचे देखील 55 हजार रुपयांचे नुकसान केले. तसेच संतप्त जमावाने शहागंज येथील लॉजवर पेट्रोल बॉंब फेकले. त्यामुळे लॉजला आग लागली. आगीत 72 वर्षिय जगनलाल छगनलाल बन्सीले जिवंत जळाले. संतप्त जमाव पांगत नसल्याचे पाहुन पोलिसांनी प्लास्टिकच्या गोळ्यांनी गोळीबार केला. यात 17 वर्षीय मुलाचा मृत्यु झाला होता. प्रकरणात सिटीचौक पोलिस ठाण्यात 10, जिन्सी पोलिस ठाण्यात दोन तर क्रांतीचौक पोलिस ठाण्यात एक असे सुमारे 13 गुन्हे दाखल करण्यात आले. 

कर्त्या मुलाचा मृत्यू 
प्रकरणात मृत मुलगा अब्दुल हरिष कादरी (17) याचे वडील मोहम्मद यांनी जिल्हा न्यायालयात फौजदारी अर्ज दाखल केला. अर्जात, मुलाच्या मृत्युस कारणीभूत संबंधीतांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावेत अशी विनंती करण्यात आली. अर्जावरील सुनावीवेळी कादरी यांच्यावतीने सर्वोच्च न्यायालयातील पिपिल्स युनियन फॉर सिव्हील लिर्बटिज विरुद्ध महाराष्ट्र शासनचा निकालाचा हवाला देत संबंधीतांवर गुन्हा नोंदविण्याचे विनंती करण्यात आली. 

उच्च न्यायालयात  दाद मागणार 
सुनावणीदरम्यान सरकार पक्षाने सदरील सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा हा एनकाउंटरसंबंधी आहे. जमाव हिंस्त्र झाल्यास त्याला बळाचा वापर करुन पांगविण्याचा अधिकार पोलिसांकडे आहे. त्यात कोणाला इजा झाल्यास तो गुन्हा ठरत नसल्याचे न्यायालयाच्या निर्दशनास आणुन देण्यात आले. दोन्ही बाजुच्या युक्तीवादानंतर न्यायालयाने वरील आदेश दिले. दरम्यान या आदेशाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Milk Price Hike: दसरा-दिवाळीआधीच दूध महागणार? तब्बल 8 रुपयांची वाढ! सरकारला 3 दिवसांचा अल्टिमेटम

Nagpur Longest Flyover : गडकरींचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण! इंदोरा ते दिघोरी 8.9 किमीचा प्रवास आता सुसाट; उड्डाणपुलाला मिळणार डॉ. हेडगेवार यांचे नाव, जाणून घ्या नवीन पुलाविषयी...

६ महिन्यांच्या चिमुकल्यावर कुत्र्याचा हल्ला, पिटबुल नव्हे तर American Bully; मालक म्हणाला, उपचारावर ४ लाख खर्च केले

Ajit Agarkar Salary : अजित आगरकरने BCCI कडून किती पगार घेतला? त्याच्या कार्यकाळात भारताची कामगिरी कशी झाली? Report Card

Latest Marathi News Update : सोने दरात आणखी वाढ, सोने दिड लाखांवर

SCROLL FOR NEXT