crime esakal
मराठवाडा

Beed Crime News : बापाचाच मुलीवर सतत अत्याचार, अल्पवयीन नातीवरही केली बळजबरी; नराधम बापाला अटक

माणूसकीला काळीमा फासणारी घटना बीडमध्ये आली समोर.

सकाळ वृत्तसेवा

बीड - अगोदर पोटची मुलगी अल्पवयीन असल्यापासून तिच्यावर बळजबरीने लगट करुन नंतर ती मोठी झाल्यानंतर अत्याचार करणाऱ्या एकाने पुढे अल्पवयीन नातीवरही बळजबरी केली. माणूसकीला काळीमा फासणारी घटना शहरातील शिवाजी नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या प्रकरणी एकावर गुन्हा नोंद झाला असून पोलिसांनी त्याला अटक केली.

याबाबत पिडीतेने फिर्यादीत म्हटले आहे, ती अल्पवयीन असताना तिचा वडील सातत्याने तिच्याशी लगट करत असे. ती सज्ञान झाल्यानंतर त्याने तीचे लैंगीक शोषण केले. त्याने अनेक वर्षे अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

पीडिता लग्नालाही पित्याने खोडा घातल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले. लग्नानंतर माहेरी येताना अत्याचाराच्या भितीने आपण कधीही एकटी येत नसे व मुक्कामी राहत नसे. दरम्यान पीडितेचा भाऊ पुण्याला काम करतो. त्याची पत्नी वारल्याने त्याने त्याची लहान मुलगी त्याच्या आई-वडिलांकडे ठेवली. तिच्यावरही या व्यक्तीने लैंगीक अत्याचार केला.

मुलगी घरात कोणालाच काहीही बोलत नसल्याने पीडितेला याचा संशय आला. त्यामुळे तिने व तिच्या नवऱ्याने त्या मुलीला बीडच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल केले असता याचे बिंग फुटले. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपीला अटक केली आहे.

दरम्यान, संशयिताच्या पत्नीला मानसिक आजार असल्याने तिच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र पोटच्या मुलीनेच या प्रकाराला वाचा फोडत आपल्या पित्याचे कारनामे उघड केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT