मराठवाडा

पंतप्रधान मोदींची हुकमशाही देशाला बुडवेल : फौजिया खान

हरी तुगावकर

लातूर : केंद्र सरकार म्हणजे एकटे नरेंद्र मोदीच दिसत आहेत. कोणत्याही निर्णयात मंत्र्याचा सहभाग दिसत नाही. एकटेच निर्णय घेतले जात आहेत. पंतप्रधान मोदी यांची ही हुकूमशाही लोकशाहीला घातक तर आहेच पण देश बुडवेल, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आमदार फौजिया खान यांनी येथे शुक्रवारी (ता. २८) पत्रकार परिषदेत केली.

पक्षाच्या वतीने संविधान बचाव देश बचाव अभियान सुरु करण्यात आले आहे. हे
अभियान शुक्रवारी येथे आले. यानिमित्ताने त्या बोलत होत्या. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत औरंगाबाद येथे नऊ ऑक्टोबर रोजी या अभियानाचा समारोप होणार आहे.

देशात आज संविधान सुरक्षित नाही. संविधानाची प्रत जाळली जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात घोषणाबाजी दिली जात आहे. ही बाब गंभीर आहे. देशद्रोह आहे. मन की बात करणारे मोदी यावर मात्र बोलत नाहीत. संविधान त्यांना नको आहे, लोकशाही नको आहे. हुकूमशाही त्यांना पाहिजे आहे. सध्या देशात अघोषित आणीबाणी लागू आहे, असे त्या म्हणाल्या.

राज्यात महिला व मुली असुरक्षित असताना मुख्यमंत्री फडणवीस मात्र स्वतःची
पाठ थोपटून घेत आहेत. देशात व राज्यात कॉर्पोरेट भ्रष्टाचार वाढला आहे. राफेल विमान खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाला आहे. पवार यांनी मोदी यांची कधीही पाठराखण केलेली नाही. राफेल विमान खरेदीबाबत त्यांचे वक्तव्य चुकीच्या पद्धतीने दाखविण्यात आले आहे, असेही त्या म्हणाल्या.

यावेळी आमदार विद्या चव्हाण, आशा भिसे, राजलक्ष्मी भोसले, सोनाली देशमुख,
बसवराज पाटील नागराळकर, संजय शेटे, मुर्जूजा खान, अफसर शेख आदी उपस्थित
होते.

..तर व्याभिचार वाढेल
विवाहबाह्य संबंध गुन्हा नसल्याचा निर्वाळा देत सर्वोच्च न्यायालयाने कलम ४९७ रद्द केले आहे, यावर बोलताना श्रीमती फौजियाखान म्हणाल्या, आपल्या संस्कृतीत विवाह संस्था ही एक महत्वाची संस्था आहे. न्यायालयाचा निकाल काय आहे त्याचा अभ्यास करावा लागेल, पण असे झाले तर विवाहसंस्था मोडकळीस
येऊन व्याभिचार वाढेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

Water On Moon : चंद्रावर अपेक्षेपेक्षा जास्त पाण्याचे साठे.... इस्त्रोने केला मोठा खुलासा

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आसामच्या काही भागांमध्ये पूर

SCROLL FOR NEXT