Coronavirus News, Latur  
मराठवाडा

वातावरण बदलामुळे वाढतेय कोरोनाची भीती, लातूरातील शाळा सतर्क

सकाळ वृत्तसेवा

लातूर : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाने महाराष्ट्रात शिरकाव केला आहे. तर दुसरीकडे शहरात वारंवार ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. या दोन्ही कारणांमुळे नागरिकांमध्ये कोरोनाची भीती आणखी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर, शहरातील बहुतांश शाळा आणि पालक सर्तक झाले आहेत. त्यामुळेच विद्यार्थी शाळेत जाताना मास्क बांधून जात आहेत, तर काही मुले चेहऱ्याला रुमाल बांधत आहेत. लातूरातून पुण्याला जाणाऱ्या ट्रॅव्हल्समध्येही आता कोरोनापासून बचाव करण्यासाठी सुरक्षाविषयक सूचना द्यायला सुरवात झाली आहे.


देशाच्या वेगवेगळ्या भागात कोरोनाची लागण झालेले रूग्ण आढळून येऊ लागले आहेत. पण, महाराष्ट्रात कोरोनाचा शिरकाव झाला नसल्याने अनेकांना भीती नव्हती. मात्र दोनच दिवसांपूर्वी पुण्यात कोरोनाचे रुग्ण आढळून आले. ही संख्या वाढत असल्याने राज्यात सर्वच भागात विशेष दक्षता घ्यायला सुरवात झाली आहे. लातूरातही असेच चित्र पहायला मिळत आहे. केवळ सरकार किंवा वैद्यकीय पातळीवरच नव्हे तर आता शाळा, महाविद्यालय, ट्रॅव्हल्स वाहतूक अशा ठिकाणीही योग्य ती काळजी घ्यायला सुरवात झाली आहे. रस्त्यांवरही रूमाल, साधे मास्क बांधून वाहने चालविणाऱ्यांची संख्या वाढली आहे. महिलांमध्ये चेहऱ्याला स्टॉल बांधण्याचे प्रमाण वाढल्याचेही दिसून येत आहे.


जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे (पाखरसांगवी) मुख्याध्यापक मोहन भोसले म्हणाले, कोरोनाची लागण होऊ नये म्हणून योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे शाळेत येताना अनेक विद्यार्थी स्वत:हून चेहऱ्याला रुमाल बांधून येत आहेत. डबा खाण्याआधी ते साबणाने आपले हात स्वच्छ धुतात. तशी सुविधा शाळेने उपलब्ध करून दिली आहे. काही विद्यार्थी स्वत:हून सोबत साबण आणत आहेत. काय काळजी घ्यावी, हेही आम्ही प्रार्थनेच्या वेळी मुलांना सांगतो. श्री श्री रविशंकर विद्यालयाच्या प्राचार्या विनया मराठे म्हणाल्या, कोरोनाबाबत जागरूकता वाढत असल्याने काही विद्यार्थी मास्क बांधून शाळेत येत आहेत. त्यातही मुल आजारी असेल तर आम्ही त्याच्या पालकांना तातडीने डॉक्टरांकडे घेऊन जायला सांगतो. हात स्वच्छ धुण्याच्या सुचनाही मुलांना दिल्या जातात.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis: फलटणला सर्वात आधुनिक शहर बनवू: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; टीकाटिप्पणीपेक्षा विकास हा माझा अजेंडा!

ख्रिसमस सेलिब्रेशनमध्ये गोड ट्विस्ट! 5 मिनिटांत घरच्या घरी बनवा विना अंड्याची Brownie, लगेच ट्राय करा

Marathi Career Rashi Bhavishya: आजचा दिवस भाग्यवान! सूर्य–मंगळ संयोगामुळे 'या' राशींना मिळणार करिअर आणि आर्थिक फायदा

अग्रलेख - सरकारी माणिकशोभा!

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंचं 'Arrest Warrant' घेवून नाशिक पोलिस मुंबईतील लीलावती रूग्णालयात दाखल!

SCROLL FOR NEXT