Marathwada sakal
मराठवाडा

Marathwada: पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने संपवले जिवन; पतीसह दोघाविरूद्ध गुन्हा दाखल

Beed Crime: पतीला अटक केल्याची माहीती फौजदार स्वप्नील कोळी यांनी दिली.

भास्कर सोळंके

Jategaon Crime : एका ३५ वर्षीय विवाहीतेने स्वतःच्या शेतात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी राजापुर येथे घडली. पती पत्नीमध्ये झालेल्या वादानंतर तिने हे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.

मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करत माहेरकडील नातेवाईकांनी गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पावित्रा घेतला असताना पती व अन्य दोन जणांविरुद्ध तलवाडा पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजापुर(ता गेवराई)सुनिता ठकाराम बेडके (वय ३५) हिने आज सकाळी स्वतःच्या शेतात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. तलवाडा पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले होते.

विवाहीतेच्या आत्महत्येनंतर संतप्त नातेवाईकांनी गर्दी करत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही यशी भुमिका घेतली होता.यावरुन मृताचे पती ठकाराम बेडके याच्यासह अन्य दोन जणांविरुद्ध तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पतीला अटक केल्याची माहीती फौजदार स्वप्नील कोळी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News : कल्ला होणार... CSK संजू, सर्फराज यांच्यासह ५ खेळाडूंना पदार्पणाची संधी देणार, आयपीएल गाजवणार

IDBI बँकेत १३०० पदांसाठी मोठी भरती; पदवीधर उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

वृद्ध, दिव्यांग कर्मचाऱ्यांचा त्रास कमी होणार, कार्यालयांत विशेष सुविधा मिळणार; पालिकेचा महत्त्वाचा निर्णय

MLA Randhir Savarkar: शेतकऱ्यांच्या पीक कर्ज फेडीची मुदत ३० जूनपर्यंत वाढवावी: आमदार रणधीर सावरकर, अन्याय दूर करा!

Sanju Samson 0.32s Video: संजू सॅमसनचा 'हा' Video का झालाय व्हायरल? लोकेश राहुलने हाक मारली, सुरुवातीला तो पुढे निघून गेला अन्...

SCROLL FOR NEXT