file photo 
मराठवाडा

कत्तीने हल्ला, पाच वर्षाचा तुरुंगवास 

प्रल्हाद कांबळे

नांदेड : अनैतीक संबंधास का अडथळा निर्माण करतो, असे म्हणून कत्तीने प्राणघातक हल्ला करणाऱ्यास येथील अतिरिक्त सत्र न्यायाधिश ए. आर. धामेचा यांनी शनिवारी (ता. २१) पाच वर्ष व साडेतीन हजाराची शिक्षा सुनावली. 

नांदेड तालुक्यातील सिध्दनाथपूरी येथील एक शेतकरी आपल्या शेतात ता. २१ जानेवारी २०१८ रोजी तुरीचे खळ करीत होता. यावेळी त्याच गावातील विश्‍वनाथ दगडफोडे (वय ३५) हा तेथे गेला. सायंकाळी सहाच्या सुमारास विश्‍वनाथ तेथे आपल्या हातात कत्ती घेऊन पोहचला. यावेळी आमच्या अनैतीक संबंधास का आड येत आहेस असे म्हणून सुभाष या शेतकऱ्यावर कत्तीने जबर वार केला. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांच्या नातेवाईकांनी आरडाओरडा केल्याने बाजूच्या शेतात त्यांच्या मेव्हणा हरी पाटील हा धावत आला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आपल्या भाऊजीला घेऊन त्याने नांदेडच्या शासकिय रूग्णालयात दाखल केले. त्यानंतर एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी आणले. 

दोघांविरुध्द गुन्हा दाखल

जखमीच्या फिर्यादीवरुन नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात विश्‍वनाथ दगडफोडे व एका महिलेविरूध्द प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक आश्रोबा घाटे यांनी तपास करून आरोपीला अटक केली. त्याची जामिनावर सुटका झाली होती. या प्रकरणाचा तपास करून श्री. घाटे यांनी न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले. न्यायाधिश धामेचा यांनी विश्‍वनाथ दगडफोडे यांना पच वर्ष सक्तमजुरी व साडेतीन हजाराचा दंड अशी शिक्षा सुनावली. मात्र सबळ पुराव्या अभावी एका महिलेची निर्दोष सुटका केली. प्रकरणात सरकार पक्षाची बाजू ॲड. यादव प्रकाश तळेगावकर यांनी मांडली तर आरोपीचा बचाव ॲड. डी. के. हांडे यांनी करण्याचा प्रयत्न केला. 

आरोपीचे सर्व नातेवाईक हजर

एक वर्षापूर्वी दाखल झालेल्या गुन्ह्याचा निकाल शनिवारी (ता. २१) डिसेंबर रोजी आल्याने विश्‍वनाथला शिक्षा होते की निर्दोष सुटते हे पाहण्यासाठी नातेवाईकांनी न्यायालयात गर्दी केली होती. सकाळी साडेअकराच्या सुमारास ही शिक्षा न्यायाधिश धामेचा यांनी सुनावली. मात्र यात अडकलेल्या एका महिलेची त्यांनी सुटका केली. शिक्षा सुनावल्यानंतर नांदेड ग्रामिण पोलिसांनी आरोपी विश्‍वनाथ दगडफोडे याची रवानगी कारागृहात केल्याचे पोलिसांनी सांगितले.  
  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २१ वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, नवव्या मजल्यावरून उडी मारत संपवलं आयुष्य

Pachod News : पोळ्याच्या आनंदावर दुष्काळाचे विरजण..! बैलांना आंघोळ घालायलाही नाही पाणी

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी चार युवक पाण्याच्या टाकीवर; सरकारच्या भूमिकेविरोधात संताप

Pune Crime : पतीच्या विवाहबाह्य संबंधांना कंटाळून पत्नीने संपविले जीवन

त्यांच्या मिसेस आमच्यासाठी चहा घेऊन आल्या... सचिन तेंडुलकरांच्या पाहुणचाराने भारावलेला निलेश साबळे; म्हणाला- जेव्हा ते आले...

SCROLL FOR NEXT