Female police constable was tried to kill 
मराठवाडा

पोलिस महिलेला जाळून मारण्याचा प्रयत्न  

प्रल्हाद कांबळे

नांदेड : सून असलेल्या पोलिस महिलेला पैशाची मागणी करून तिचा छळ केला. एवढेच नाही तर तिच्या अंगावर रॉकेल टाकून जाळून ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी (ता. २२) पहाटे दोनच्या सुमारास वहाद (ता. कंधार) येथे घडली. या प्रकरणी तिच्या सासरच्या मंडळीवर माळाकोळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

वहाद (ता. कंधार) येथील विवाहिता ही परभणी पोलिस दलात कार्यरत आहे. टेंभूर्णी ता. अहमदपूर माहेर असलेल्या या विवाहितेचे सासर वाहद आहे. लग्नानंतर तिला काही दिवस सासरी चांगले नांदवले. नंतरच्या काळात तीन लाखाची मागणी करून तिचा छळ सुरू केला. छळ होऊ नये म्हणून पतीला कर्ज काढून तीन लाख रुपये खर्च करून किराणा दुकान टाकून दिले. पुन्हा तुझा पगार आम्हाला का देत नाहीस म्हणून तिचा वांरवार छळ करीतचे होते. पती हा शेतकरी असल्याने तिला वेळप्रसंगी मारहाण करित अस्याचे पोलिसांनी सांगितले. एवढेच नाही तर तिच्याशी रविवारी (ता. २२) रात्री वाद घालून अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले. यात ती गंभीर भाजली आहे. तिच्यावर विष्णुपूरी येथील शासकिय रुग्णालयात उपचार सुरू आहे. पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून माळाकोळी पोलिस ठाण्यात पती सतीश जाधव, सासरा हनमंत जाधव, सासु गेंदाबाई जाधव, तुकाराम घोगरे आणि अर्चना घोगरे यांच्याविरुध्द ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सोमवारी (ता. २३) रात्री साडेअकराच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक आश्रोबा घाटे करित आहेत. 

पोलिस असलेल्या विवाहितेला जर जाळून मारणाऱ्या सासरच्या मंडळींकडून प्रयत्न होत असले तर सर्वसामान्य विवाहितांची काय अवस्था असेल याची वाच्यता न केलेली बरी. जिल्ह्यात अशा अनेक घटनांत वाढ होत असल्याने विवाहिता भयभीत झाल्या आहेत. सासरच्या मंडळीना कठोर शासन व्हावे अशी पिडीत महिलांतून मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND VS AFG 3RD T20I: २० चेंडूंत १०२ धावा... Abhishek Sharma ने ट्वेंटी-२०चा इतिहास-भूगोल बदलला! एक नव्हे अनेक विक्रम मोडले, सेलिब्रेशन तर भारीच केले Video Viral

Tarapur Leopard Scare: तारापूर-चिंचणी परिसरात बिबट्याला गुरांचा चोप; नागरिकांमध्ये भीती, वनविभागाकडे जेरबंदाची मागणी

IND VS AFG 3RD T20I: अभिषेक शर्माने इतिहास रचला; ट्वेंटी-२०तील सर्वात वेगवान शतक!मोडला रोहित शर्माचा विक्रम, विराटशी बरोबरी

Pune Ganeshotsav Traffic : पुण्यात गणेशोत्सवानिमित्त वाहतुकीत मोठा बदल; 18 ते 25 सप्टेंबरदरम्यान 'हे' प्रमुख रस्ते राहणार बंद, जाणून घ्या महत्त्वाचे पर्यायी मार्ग

Gangapur Sugar Mill: गंगापूर सहकारी साखर कारखाना कर्जमुक्त करण्याचा निर्धार; जय हिंदने गाळप केलेल्या ऊसाचे बिल १५ दिवसांत देण्याचे आश्वासन

SCROLL FOR NEXT