festival of Namdev Maharaj Jayanti starts in Narsi Namdev 
मराठवाडा

नरसी नामदेव येथे संत नामदेव महाराज जयंती महोत्‍सव सुरू

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : तालुक्‍यातील नरसी नामदेव येथील संत नामदेव महाराज यांच्या 479 व्या जयंती महोत्‍सवानिमित्त शनिवारपासून (ता. 2) ते शनिवारपर्यंत (ता. 9) अखंड हरिनाम सप्‍ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सप्ताहाच्या कार्यक्रमास सुरवात झाली आहे.

त्‍यानिमित्त दररोज सकाळी चार ते सहा काकडा, आठ ते अकरा दुपारी दोन ते चार नामदेव महाराज गाथा पारायण सोहळा, सायंकाळी चार ते पाच प्रवचन, पाच ते सहा हरिपाठ, रात्री आठ ते दहा कीर्तन व नंतर हरिजागर कार्यक्रम सुरू आहेत. सप्ताहात दररोज सकाळी, दुपारी व सायंकाळी अन्नदानदेखील केले जात आहे. शुक्रवारी (ता. 8) सकाळी सात वाजता एकादशीनिमित्त होणाऱ्या विशेष महापुजेचे मानकरी तहसीलदार गजानन शिंदे व रामरतन शिंदे यांच्या उपस्‍थितीत महापूजा होणार आहे. दरम्‍यान, सप्ताहात सायंकाळी चार ते पाच या वेळात राजू नागरे, ज्ञानबा महाराज, शिवाजी महाराज डांगे, भगवान महाराज गिलोरी यांचे प्रवचन झाले. तर बुधवारी (ता. 6) उमाकांत महाराज नरसी, सुभाष महाराज जांभरून यांचे प्रवचन होणार आहे. शनिवारपासून रात्री आठ ते दहा या वेळात सुरू झालेल्या कीर्तनात शिवसांब महाराज नरसी, केदारलिंग महाराज कडती, दामोधर महाराज वैजापूर यांचे कीर्तन झाले आहे. बुधवारपासून (ता. 6) बंडू महाराज बीडकर, ग्यानेदव महाराज मकोडी, रमेश महाराज मगर यांचे कीर्तन होणार आहे.

शुक्रवारी (ता. 8) दुपारी दोन ते चार या वेळात संत नामेदव महाराज यांच्या पालखीची नगरप्रदक्षिणा होणार आहे. शनिवारी (ता. 9) भागवताचार्य भारत महाराज बेंगाळ कोळसेकर यांचे नऊ ते अकरा या वेळात काल्याचे किर्तन होणार आहे. त्‍यानंतर महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन संत नामदेव महाराज मंदिर संस्‍थान, परिसरातील भावीक भक्‍त मंडळी व ग्रामस्‍थांतर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Police Department News : कोल्हापूर पोलीस दलात एका पदासाठी सात अधिकाऱ्यांची मोठी फिल्डिंग, गुन्हे अन्वेषण शाखेत काय सुरूय

Crime News: भोंदूबाबाकडून महिलेच्या गुप्तांगाला स्पर्श अन्..., खरातनंतर आणखी एक प्रकरण बाहेर ; नेमके काय घडले?

Latest Marathi News Live Update : महाडमध्ये गुरुशिष्य नात्याला काळीमा! क्लास मालकावर विद्यार्थ्याचा लैंगिक छळ केल्याचा आरोप

Pune Crime: लोणी काळभोर हद्दीतील अवैध हातभट्टी दारु धंद्यांवर कारवाई, २ लाख ९५ हजार रुपयांचा ऐवज जप्त; तिघांना अटक!

छावा फेम अभिनेत्याच्या घरी चिमुरड्याचं आगमन; लग्नानंतर पाच वर्षांनी दिली आनंदाची बातमी

SCROLL FOR NEXT