crime
crime 
मराठवाडा

गर्भलिंग निदान करणाऱ्या डॉक्‍टरचा पर्दाफाश 

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद : पंधरा हजार रुपये घेऊन गर्भलिंग निदान करणाऱ्या एका डॉक्‍टरच्या फ्लॅटवर मंगळवारी (ता. 11) महापालिकेच्या आरोग्य विभागाने छापा मारून त्याला बेड्या ठोकल्या.

उस्मानपुरा भागात गेल्या दोन वर्षांपासून हा गोरखधंदा सुरू होता. डॉक्‍टराने ग्राहक मिळविण्यासाठी एजंट नेमल्याचे समोर आले असून, मोठे रॅकेट उघडकीस येण्याची अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. 

उस्मानपुरा भागातील भाजीवालीबाई चौकात असलेल्या प्रत्येय अर्पाटमेंटमध्ये गर्भलिंग निदान करण्यात येत असल्याची तक्रार महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे सोमवारी (ता.21) करण्यात आली होती. त्यानुसार आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळाकर यांच्या नेतृत्वाखाली दुपारी 12.30 वाजता सापळा लावण्यात आला.

एक वाजेच्या सुमारास गर्भावती महिला या फ्लॅटमध्ये गेली असता पथकाने पोलिसांसह छापा मारला. यावेळी महिलेची तपासणी करून दिला गर्भाचे लिंग सांगण्यात आल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी डॉ. सुजय सुर्यकांत राणा (वय 55) याला ताब्यात घेतले. फ्लॅटमध्ये असलेली सोनोग्राफी मशिन सिल करण्यात आली असून, ती नाशिक येथून खरेदी करण्यात आल्याचे राणा याने सांगितले. या प्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT