मराठवाडा

विरोधीपक्षनेते धनंजय मुंडेवर दोषारोपपत्र दाखल

सकाळवृत्तसेवा

बीड- राष्ट्रवादीचे आमदार आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह दोघांवर अंबाजोगाईच्या जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले आहे. अंबाजोगाई तालुक्यातील पूस येथे जगमित्र साखर कारखान्यास दिलेल्या जमिनीच्या मोबदल्यापोटी चाळीस लाख रुपयांचा धनादेश न वटल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

मुंडे यांनी कारखान्यासाठी घेतलेल्या जमिनीच्या मोबदल्यापोटी शेतकऱ्याला दिलेला 40 लाख रुपयांचा धनादेश न वटल्या प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी डिसेंबर महिन्यात आमदार मुंडेंवर दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याची माहिती शासनातर्फे खंडपीठात देण्यात आली होती. शेतकरी मुंजा किसनराव गीते यांची तीन हेक्‍टर 12 आर जमीन पूस (ता. अंबाजोगाई) येथील जगमित्र साखर कारखाना उभारणीसाठी घेण्यात आली होती. 50 लाखांत घेण्यात आलेल्या या जमिनीचे खरेदीखत करण्यात आले. ठरल्याप्रमाणे प्रथम एक लाख व नंतर सात लाख 81 हजार 250 रुपयांचा धनादेश देण्यात आला. नंतर आमदार मुंडे यांनी परळीच्या बॅंक ऑफ महाराष्ट्रचा 40 लाख रुपयांचा धनादेश गीते यांना दिला. हा धनादेश न वटताच परत आला.

या प्रकरणी न्यायालयाच्या निर्देशानंतर पोलिसांनी अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल केले आहे. 420, 465, 468, 471, 419 या कलमाअन्वये मुंडे यांच्यावर दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये या प्रकरणाची न्यायालयात पहिली तारीख असणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: सलमान खान गोळीबार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल; सीबीआय तपासाची केली मागणी

Virat Kohli : 'खूप फसवणूक झाली मात्र आता...' विराट कसा झाला 634 कोटी रूपयाचा मालक?

Car Maintenance Tips: कारची 'अशी' घ्या काळजी, अन्यथा लागेल गंज

Juice For Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांनी प्यायलाच हवेत 'हे ज्यूस, रक्तातील साखरेची पातळी राहील नियंत्रणात

Karan Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहच्या मुलाच्या प्रचार रॅलीत फायरिंग? चौकशीतून काय समोर आलं?

SCROLL FOR NEXT