photo 
मराठवाडा

...अखेर ग्लॅडर्ससृद्श आजाराने घेतला ‘सिद्धी’चा बळी

जगन्नाथ पुरी

सेनगाव (जि. हिंगोली): तालुक्‍यातील वलाना येथील ग्लॅन्‍डर्ससदृश आजाराजी लागन झालेल्या ‘सिद्धी’ नामक घोडीचा रक्‍त नमुन्याचा अहवाल येण्यापूर्वीच गुरुवारी (ता.दोन) मृत्‍यू झाला. गावापासून दोन किलोमीटर अंतरावरील शेतात आठ फूट खोल खड्डा खोदून ‘सिद्धी’वर अंत्यसंस्कार करण्यात आले.

तालुक्यातील वलाना येथील शेतकरी गजानन पाटील यांचा वडिलोपार्जित घोडे पाळण्याचा छंद आहे. चांगल्या प्रजातीची घोडे त्यांच्याकडे असतात. त्यांच्याकडे साडेतीन लाखांची एक घोडी असुन आणखी एक ‘सिद्धी’ नामक घोडी डिसेंबर (ता.१४) मध्ये सेनगाव येथून खरेदी केली. परंतु, तीन दिवसानंतर सिद्धी अचानक आजारी पडली. या घोडीच्या अंगावर सुरुवातीला लहान फोड आले. त्याचे रूपांतर जखमांमध्ये होऊ लागले.

‘सिद्धी’चे विविध नमुने प्रयोग शाळेकडे पाठविले 

 पशुधन विकास अधिकाऱ्यांकडून औषधोपचार केला. वाशिम येथून ही खासगी डॉक्टर आणले. मात्र ‘सिद्धी’च्या तब्येतीत कोणतीच सुधारणा झाली नाही. त्यांनी अखेर परभणी येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयात ‘सिद्धी’ला नेले. तेथील तज्ज्ञांकडून ‘ग्लॅन्डर्स’आजार झाला असावा असे मत व्यक्त केले. ही माहिती पशुसंवर्धन विभागाला समजताच सहायक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. गौस महम्मद खान यांच्या पथकाने वलाना येथे भेट दिली. आजारी ‘सिद्धी’चे विविध नमुने संकलित करून डिसेंबर (ता.३०) औरंगाबाद येथील विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळेकडे पाठविले. तेथून राष्ट्रीय अश्व अनुसंधान केंद्र हिसार (हरियाणा) येथे नमुने पाठविण्यात आले आहेत. सिद्धीच्या रक्त नमुन्याचा अहवाल येण्यापूर्वीच गुरुवारी दुपारी मृत्यू झाला. 

जीवघेणा संसर्गजन्य आजार

मालक गजानन पाटील यांनी १५ दिवसांत औषधोपचारावर जवळपास ४० हजार रुपये खर्च केला. मात्र त्यांना यश आले नाही. गावापासून दोन किलोमीटर अंतर असलेल्या स्वतःच्या शेतात आठ फूट खोल खड्डा खोदून ‘सिद्धी’वर अंत्यसंस्कार करण्यात आले. माळेगाव यात्रेत हजारों घोडे विक्रीसाठी दाखल होतात. तिथे तिची सहज विक्री होऊ शकत होती. मात्र ग्लॅन्डर्स हा आजार भयंकर व जीवघेणा असून त्याचा संसर्ग इतर प्राण्यांना होऊ नये, याची त्यांनी विशेष खबरदारी घेतली. 


अहवालाची प्रतीक्षा

अखेरच्या क्षणापर्यंत ‘सिद्धी’च्या औषधोपचारासाठी श्री. पाटील झटले. मात्र नियतीने साथ न दिल्याने आजारी ‘सिद्धी’ चा अखेर मृत्यू झाला. ग्लॅन्डर्स हा आजार गोडे, गाढव, खेच्चर या प्राण्यांना होतो. हा भयंकर व जीवघेणा आजार असून संसर्गजन्य आहे. इतर प्राणी व मनुष्यांना लागण होण्याची शक्यता असते. ‘सिद्धी’ चे विविध पाठविलेल्या नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे  


अहवाल प्राप्त होण्यापूर्वीच मृत्यू

आमच्या कुटुंबात वडिलोपार्जित घोडे पाळली जातात. तो मी छंद जोपासतो. लग्नसमारंभात वरातीसाठी घोडे दिली जातात. दोन लाखांत ‘सिद्धी’ला विकत आणले. ती आजारी पडली. ग्लॅन्डर्ससदृश आजाराची शंका व्यक्त केल्यावर तिच्यापासून इतर प्राण्यांना संसर्ग होऊ नये, याची विशेष खबरदारी घेतली. तिच्या आजाराचा अहवाल प्राप्त होण्यापूर्वीच गुरुवारी तिचा मृत्यू झाला.
-गजानन पाटील 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Shirsat Video: पैशाने भरलेली बॅग, बनियनवर बेडवर बसले अन् हातात...; शिरसाटांचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

IND vs ENG 3rd Test: दुखापतग्रस्त रिषभ पंतने माघार घेतल्यास ध्रुव जुरेल फलंदाजी करू शकतो का? ICC चा नियम काय सांगतो?

Latest Marathi News Updates : पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांचे आंदोलन

Stock Market Crash: आज शेअर बाजार का कोसळला? सेन्सेक्स 700 अंकांनी खाली; कोणते शेअर्स घसरले?

नवीन मालिका 'तारिणी'साठी झी मराठीची 'ही' मालिका घेणार निरोप? प्रेक्षकांनीच सांगितलं नाव, म्हणाले-

SCROLL FOR NEXT