Medical College Admission News esakal
मराठवाडा

लातूर : वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत ससेहोलपट

प्रत्येक फेरीला विद्यार्थ्यांना सहन करावा लागतो हजारोंचा आर्थिक भुर्दंड

हरी तुगावकर : सकाळ वृत्तसेवा

लातूर : राज्यात शासकीय व खासगी वैद्यकीय महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेत विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रामुख्याने प्रत्येक फेरीला हजारो विद्यार्थ्यांना हजारोचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. ही प्रवेश प्रक्रिया सुलभ व्हावी, फेरीनिहाय ठराविक शुल्क घेऊन ऑनलाइन प्रवेश देण्याची गरज व्यक्त होत आहे

.वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत अखिल भारतीय पातळीवरच्या कोट्यातूनही प्रवेश दिले जातात. तेथे प्रत्येक फेरीच्यावेळी नोंदणी करता येते. महाविद्यालयाचा पर्याय टाकण्याचीही सोय आहे. राज्याच्या प्रवेश प्रक्रियेत मात्र विद्यार्थ्यांना एकदा नोंदणी केली की तीच शेवटपर्यंत ठेवावी लागते. पर्याय बदलाची (ऑप्शन चेंज) सोयच नाही. पहिल्या फेरीत एखाद्या महाविद्यालयात क्रमांक लागला व तेथे प्रवेश घेतला नाही तर विद्यार्थी सरळ प्रवेश प्रक्रियेच्या बाहेरच पडत आहे. त्यामुळे शासनाने प्रत्येक फेरीला नोंदणी व पर्याय बदलाची सोय देण्याची गरज व्यक्त होत आहे.

दुरुस्तीला वावच नाही

या प्रवेश प्रक्रियेत नोंदणीच्या वेळीच कागदपत्र अपलोड करून घेतली जातात, पण त्याची पडताळणी (व्हेरिफिकेशन) कली जात नाही. याचाही फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. नोंदणीच्या वेळी एखादी चूक झाली तर त्यात दुरुस्त करण्याचा वाव नाही. दुसरा अर्ज भरला तर दोन्ही अर्ज रिजेक्ट होण्याची भीती आहे. यात शासनाने अर्जात दुरुस्ती करण्याची संधीही उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त होत आहे.

फेरीनिहाय घ्यावा लागतो प्रवेश

सध्या ऑनलाइन पद्धत सुरू आहे. पण या प्रवेश प्रक्रियेत मात्र प्रत्येक फेरीला क्रमांक लागलेल्या संबंधित महाविद्यालयात प्रत्यक्ष जाऊन कागदपत्र सादर करून प्रवेश घ्यावा लागतो. इतकेच नव्हे तर एक लाखापासून ते पंधरा लाखांपर्यंतचा डीडीही काढून सादर करावा लागतो. यासोबतच महाविद्यालयाच्या हॉस्टेल, मेस, लायब्ररी आदी सर्वांची शुल्कही भरावे लागते. त्या महाविद्यालयात प्रवेश अंतिम करायचा असो अथवा नसो, हे सर्व करावेच लागते, तरच दुसऱ्या फेरीसाठी विद्यार्थी पात्र ठरत आहेत. प्रवेशाच्या तीन ते चार फेऱ्या होतात. प्रत्येक वेळेस विद्यार्थ्यांना नवीन डीडी काढणे, प्रवेश घेणे, पुन्हा रद्द करणे असे प्रकार करावे लागत आहेत. यात शासनाने अंतिम प्रवेशाच्या वेळीच सर्व शुल्क घेण्याची गरज आहे. फेरीनिहायसाठी ऑनलाइन प्रवेश व काही ठराविक शुल्क घेऊनच प्रवेश देण्याची गरज व्यक्त होत आहे.

प्रवेश प्रक्रियेत ५५ हजार विद्यार्थी

राज्यातील सुमारे चारशे महाविद्यालयांत एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, युनानी, नर्सिंग अशा शाखांच्या सुमारे २९ हजार जागा आहेत. यावर्षी सुमारे ५५ हजार विद्यार्थी या प्रवेश प्रक्रियेत आहेत. यातून प्रत्येक फेरीला हजारो विद्यार्थी पुढच्या फेरीत जात आहेत. प्रत्येक फेरीचा एका विद्यार्थ्याचा किमान दहा हजारांचा आर्थिक भुर्दंड धरला तर कोट्यवधी रुपयांचे नुकसान विद्यार्थ्यांचे होत आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेत सुलभता यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

माझ्या मुलाचा पहिल्या फेरीत अमरावती येथील वैद्यकीय महाविद्यालयात क्रमांक लागला. तेथे जाऊन दहा लाख ३५ हजार रुपयांचा धनादेश (डीडी) काढून पहिल्यांदा प्रवेश घेतला. त्यानंतरच दुसऱ्या फेरीत दाखल होता आले. या फेरीत लातूरच्या महाविद्यालयात क्रमांक लागला. येथे नऊ लाख २७ हजार रुपयांचा धनादेश देऊन प्रवेश घेतला. दोन वेळा धनादेश काढण्यासाठी लागणारे कमिशन, पहिल्या महाविद्यालयातील प्रवेश रद्द करणे आणि पहिला धनादेश रद्द करणे, जाण्या-येण्याचा खर्च असा एकूण किमान दहा हजारांचा भुर्दंड पडला आहे. शासनाने या प्रक्रियेत सुलभता आणावी, असे वाटते.

- भारत क्षीरसागर, पालक, लातूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: बुमराह लॉर्ड्स कसोटीत खेळणार की नाही? दुसऱ्या कसोटी विजयानंतर कॅप्टन गिलने स्पष्ट शब्दात सांगितलं

Ujani Dam Water: 'उजनीतून पाणी सोडण्याचा निर्णय एक दिवस लांबणीवर'; पंढरपुरातील वारकऱ्यांच्या गर्दीमुळे घेतला निर्णय

CA Final 2025 Results: सोशल मीडियापासून दूर राहिलो, आणि देशात टॉप आलो! सीए टॉपर्सची यशोगाथा

Pune : गांधीजींच्या पुतळ्याचं डोकं उडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक; काँग्रेस करणार आंदोलन

Raigad Suspicious Boat : अलिबागजवळ समुद्रात आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर; हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरु

SCROLL FOR NEXT