file photo 
मराठवाडा

देशातील पहिली शेतकरी मॅरेथॉन सोमवारी

सुषेन जाधव

औरंगाबाद : जागतिक कापूस दिनानिमित्त सोमवारी (ता. सात) शहारातील गरवारे मैदानावर देशातील पहिली शेतकरी मॅरेथॉन (फार्माथॉन) होणार आहे. यात साधारण चारशेवर शेतकरी सहभागी होणार असून, शंभराहून अधिक महिला शेतकऱ्यांचा सहभाग असल्याची माहिती "कॉटनगुरू'चे व्यवस्थापकीय संचालक मनीष डागा यांनी शनिवारी (ता. पाच) पत्रकार परिषदेत दिली. 

जागतिक कापूस दिनानिमित्त जागतिक व्यापार संघटनेच्या पुढाकाराने कॉटनगुरूतर्फे जगातल्या पहिल्या मॅरेथॉनचे आव्हान स्वीकारले आहे. मराठवाड्यात दुष्काळ असला तरी कपाशीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे; मात्र शेतकरी केवळ कापूस पिकवत राहतात; पण निर्यात करणे, त्याची रुईगाठी बनविणे, त्यावर प्रक्रिया करणाऱ्या कंपन्यांचा अपेक्षित प्रतिसाद नसतो. त्यामुळे शेतकऱ्यांना नाइलाजाने खासगी व्यापारी, स्थानिक मार्केटमध्ये कवडीमोल भावाने विकावा लागतो.

कापूस उत्पादक शेतकरी आणि संबंधित क्षेत्रातील साधारण सहा कोटी लोक कपाशीशी जोडलेले आहेत, असे असूनही कपाशी आणि उत्पादक मागे राहिले आहेत. त्यांना हवामानाधारित बदल, चांगल्या प्रतिचे बियाणे आदी माहिती कोणी दिलीच नाही, या फार्माथॉनच्या माध्यामातून कपाशीचे महत्त्व विशद करण्यात येणार असल्याचे श्री. डागा यांनी यावेळी सांगितले. पत्रकार परिषदेला रिद्धी सिद्धी ग्रुपचे गोपाल अग्रवाल, मंजित कॉटन समूहाचे रसदीप चावला उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT