मराठवाडा

बुलेटचालकावर पहिला गुन्हा दाखल; नशेत चालवीत होता बुलेट

सकाळवृत्तसेवा

नांदेड : शहरात फटाके फोडणाऱ्या, फॅन्सी नंबर प्लेट लावलेल्या आणि कर्णकर्कश आवाजाच्या दुचाकीवर कारवाईचे सत्र सुरू असतांनाच दारुच्या नशेत एका बुलेट चालकावर कारवाई करण्यात आली. बुलेट चालकावर हा पहिलाच फौजदारी गुन्हा दाखल झाल्याने वाहनधारकांत घबराट पसरली आहे.

शहरात भाग्यनगर, शामनगर, वजिराबाद, भगतसिंग रोड, श्रीनगर, तरोडा नाका, विद्यापीठ परिसर, विष्णूपुरी परिसरात तसेच खाजगी शिकवणी, शाळा कॉलेज रस्ता, महिलां व युवतींचा ज्या भागात संचार जास्त आहे अशा ठिकाणी फटाके फोडणारी बुलेट, कर्णकर्कश हॉर्न, नशा करून वेडीवाकडी दुचाकी चालविणे, कट मारणे, धूम स्टाईल अशा प्रकारे वाहन चालविणाऱ्याची संख्या वाढत आहे.

आतापर्यंत शहर वाहतुक शाखेकडून फक्त अशा वाहनावर दंडात्मक कारवाई करण्यात येत होती. परंतु यापुढे थेट फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात येत आहे. शनिवारी (ता. 10) चारच्या सुमारास आनंदनगर रस्त्यावरील कदम हॉस्पीटलसमोर दारुच्या नशेत तर्रर्र असलेल्या स्वप्नील दिलीप कदम रा. लिंबगाव (ता. नांदेड) हा बुलेट (क्रमांक एम.एच. 26 ए.पी. 777) वरून आपल्या दोन मित्रांना सोबत घेऊन ट्रीपल सीट वेडीवाकडी बुलेट चालवित असतांना पोलिसांनी त्याला थांबविले. पोलिस निरीक्षक चंद्रशेखर ककदम यांच्या आदेशावरून हवालदार काकासाहेब रोडके यांच्या फिर्यादीवरुन विमानतळ ठाण्यात स्वप्नील कदम विरूध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरात फटाके फोडणाऱ्या बुलेट, फॅन्सी नंबर प्लेट, नंबर प्लेट नसणे, अर्धवट क्रमांक दिसणे, विनापरवाना गाडी चालविणे, काळ्या फिल्म लावणे अशा वाहनधारकांना वाहतुक शाखेकडून नेहमीच आवाहन करण्यात येत होते. काही वाहनधारकांत सुधारणा झाली मात्र अजूनही काही वाहनधारक वाहतुक नियम पाळत नसल्याचे दिसुन येते. यापुढे अशा वाहन चालकांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करणार असल्याचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: पुन्हा सूरत पॅटर्न! शेवटच्या दिवशी काँग्रेस उमेदवाराने अर्ज मागे घेत केला भाजप प्रवेश..काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदी सोलापुरात दाखल; थोड्याच वेळात होणार सभा

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

Health Care : अवकाळी पावसानंतर सावधगिरी बाळगा; सर्दीसह दमा, श्वसन विकारात होते वाढ

SCROLL FOR NEXT