ssc foto
ssc foto 
मराठवाडा

पहिल्याच पेपरला २६९ परीक्षार्थी अनुपस्थित

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : जिल्‍ह्यात माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेस मंगळवारपासून (ता. तीन) सुरवात झाली. जिल्ह्यातील ५३ परीक्षा केंद्रांवर १७ हजार २६५ परीक्षार्थींनी मराठी विषयाची परीक्षा दिली. यात २६९ परीक्षार्थींची अनुपस्थिती होती. 

मंगळवारी मराठी विषयाची परीक्षा ५३ केंद्रांवर घेण्यात आली. परीक्षेसाठी केंद्रांवर पालकांसह परीक्षार्थी वेळेपूर्वीच दाखल झाले होते. परीक्षा क्रमांक पाहण्यासाठी गर्दी झाली होती. जिल्हाभरातील केंद्रांवर १७ हजार २६५ परीक्षार्थींनी परीक्षा दिली, तर २६९ जणांनी पाठ फिरविली. दरम्यान, सोमवारपर्यंत (ता. २३) परीक्षा चालणार आहे.

परीक्षा केंद्रांना भेटी

परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचे प्रभारी सीईओ धनवंतकुमार माळी, शिक्षणाधिकारी पी. बी. पावसे, डायट प्राचार्य पुटवाड आदी अधिकारी पुढाकार घेत आहेत. मंगळवारी शिक्षणाधिकारी पी. बी. पावसे यांनी औंढा तालुक्यातील परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या. वसमत येथील परीक्षा केंद्रांना उपशिक्षणाधिकारी मलदोडे यांनी; तर डायटचे प्राचार्य पुटवाड यांनी कळमनुरी तालुक्यातील विविध केंद्रांना भेटी दिल्या. कुठल्याही केंद्रावर गैरप्रकार आढळून आला नाही.

कळमनुरीत पालक, परीक्षार्थींतून संताप

कळमनुरी ः शहरातील तीन परीक्षा केंद्रांवर दहावीची परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थींची व्यवस्था करण्यात आली आहे. गुलामनबी उर्दू हायस्कूल परीक्षा केंद्रावरील तीन परीक्षा हॉलमध्ये बसण्यासाठी ड्युएल डेक्सऐवजी साध्या बेंचची व्यवस्था करण्यात आली होती. उत्तरपत्रिका सोडवताना मोठी गैरसोय झाली. दरम्यान, परीक्षा केंद्रावर आसनव्यवस्था व इतर मूलभूत सोयी सुविधा असल्याबाबत केंद्राध्यक्ष व शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून लेखी माहिती घेतली जाते. येथे परीक्षार्थींना गैरसोयीला सामोरे जावे लागले. त्यामुळे पालक व परीक्षार्थींतून संताप व्यक्त केला जात होता. परीक्षा केंद्रावरून आसन व्यवस्था होत नसेल तर इतर परीक्षा केंद्रावर आसनव्यवस्था करून द्यावी, अशी मागणी पालक वर्गातून होत आहे. 

औंढा तालुक्यात परीक्षा सुरळीत

औंढा नागनाथ : तालुक्यातील सात केंद्रांवर दहावीची परीक्षा घेण्यात आली. या वेळी दोन हजार १२१ पैकी दोन हजार ८७ परीक्षार्थींनी परीक्षा दिली, तर ३४ परीक्षार्थी अनुपस्थित होते. गटशिक्षणाधिकारी अशोक पोफळकर यांनी परीक्षा केंद्राला भेटी दिल्या. परीक्षा सुरळीत पार पडाव्यात यासाठी रमाकांत भिकाने, केशव सारंग, इद्रिश शेख काम पाहत आहेत. जिल्हा परिषद प्राशालामध्ये केंद्रप्रमुख शिवाजी मोरे ; तर बैठे पथकमध्ये दत्तात्रय गिरी, विजय सोमटकर, श्रीमती वाय. एस. बरकुले काम पाहत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhagan Bhujbal : भुजबळांच्या समता परिषदेची बैठक संपली; केंद्र सरकारकडे 'ही' मागणी करण्याचा निर्णय

Sharad Pawar: माकप राज्यात १२ विधानसभा जागावर लढवणार निवडणूक? पावारांंसोबत झाली सकारात्मक चर्चा!

Viral Video: "इस्लाम हा एक न्याय्य धर्म, तो समाजावर लादला पाहिजे..." विद्यार्थ्याच्या खळबळजनक विधानामुळे सोशल मीडिया पेटले

X Overpayment Issue : इलॉन मस्कने कर्मचाऱ्यांचा पगार मागितला परत; कोट्यवधींच्या रक्कमेसाठी काढली नोटीस,जाणून घ्या काय आहे प्रकरण

Babar Azam: 'मी असतो तर त्वरित कॅप्टन्सी सोडली असती...', माजी कर्णधाराने बाबरवर साधला निशाणा

SCROLL FOR NEXT