parali vaidyanath temple 
मराठवाडा

Corona Impact: इतिहासात पहिल्यांदाच महाशिवरात्रीला परळीचं वैद्यनाथ मंदिर भाविकांसाठी बंद; मंदिर परिसरात पोलिस बंदोबस्त

प्रवीण फुटके

परळी वैजनाथ (बीड): बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या नगरीत श्री.वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने महाशिवरात्र यात्रा महोत्सवाचे आयोजन दरवर्षी मोठ्या उत्साहात करण्यात येते. यंदा गुरूवारी (ता.११) महाशिवरात्री होती, मात्र मंदिराच्या इतिहासात पहिल्यांदाच यात्रा महोत्सव रद्द करण्यात आला आहे. यामुळे ऐन महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसर सुना सुना झाला आहे. आज मंदिराच्या परिसरात कडेकोड पोलिस बंदोबस्त आहे.

अनादी काळापासून येथील वैद्यनाथ मंदिरात महाशिवरात्री महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. मंदिर प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात येते. महाशिवरात्री निमित्त वैद्यनाथाच्या दर्शनासाठी राज्य व परराज्यातून भाविकांची लाखोंची गर्दी असते. शिवभक्तांचा उन्हापासून बचाव व्हावा म्हणून भव्य मंडप टाकण्यात येतो. मंदिरात रंगरंगोटी करून विद्युत रोशणाई करण्यात येते. जिल्हाधिकारी यांच्याहस्ते श्री रुद्राभिषेक व नंतर भाविकांना अभिषेकास परवानगी देण्यात येते. श्री वैद्यनाथाची सवाद्य पालखी निघते. सायंकाळी ६ वाजता देशमुखपारा जवळ प्रसिद्ध गायकांचा भक्तिगीत व अभंगवाणीचा कार्यक्रम असतो.

तसेच अंबवेस येथे रात्री फटाक्यांची आतषबाजी होते. यंदा मात्र कोविड विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मंदिर ८ ते १६ मार्च पर्यंत बंद करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी सलग पाच दिवस लाखों भाविक भक्त प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतात, तिथे मंदिर परिसर एकदम सुना सुना झाला आहे. मंदिराच्या इतिहासात पहिल्यांदाच हा महोत्सव रद्द होऊन मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. यामुळे भाविक पायरीचे दर्शन घेऊन माघारी परतत आहेत. 
 
विक्रेत्यांचे मोठे आर्थिक नुकसान- 
वैद्यनाथाच्या महाशिवरात्री महोत्सवात जवळपास १० ते १५ दिवस यात्रा भरते. यात्रा परिसरात नगरपालिकेच्या वतीने सर्व व्यवस्था करण्यात येते. येथील दुकानदारांची एवढी विक्री होते की, जवळपास सहा महिने यावर ते आपला संसाराचा गाडा चालवू शकतात. जवळपास तीन महिन्यांपासून यात्रेत दुकाने लावण्याची तयारी करण्यात येते.

यंदा लहान सहान दुकानदारांचे, मंदिर परिसरातील दुकानदारांचे यात्रा रद्द झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. यासंदर्भात मंदिर परिसरातील मुर्ती विक्रेते मदन गडेकर यांनी सांगितले की, अगोदरच कोरोनामुळे मंदिर अनेक महिने बंद होते. आताच दोन महिन्यांपूर्वी ते सुरू झाले होते. यात्रा उत्सवा दरम्यान शिवभक्त मोठ्या संख्येने येत असल्याने आम्ही तीन महिन्यांपासून तयारी करतो. मोठा माल खरेदी करून ठेवतो पण यात्रा रद्द झाल्याने आमचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC: मुंबई महापालिकेतील ८०० अभियंत्यांच्या बदल्या, नवे आदेश जारी होणार; वर्षानुवर्षे ठाण मांडणाऱ्यांची उचलबांगडी

Solapur News: पगारात ६०० रुपये जास्त गेल्याने मारहाण अन् अपमान; कामगार तरुणाने जीवन संपवले, दोन वर्षांपूर्वी विवाह, महिन्याभराचा मुलगा

Cracks Appear Before Road Completion: पूर्ण होण्याआधीच महामार्गाला भेगा; गुणवत्तेची तपासणी करण्याची नागरिकांची मागणी

Kolhapur Ganeshotsav : देखाव्यांचा थाट, रस्त्यांवर गर्दीची लाट शहरात बहुतांश देखावे सुरू; राजारामपुरी, शाहूपुरी, शिवाजी पेठेत गर्दी उसळली

Ajit Agarkar याला भारताच्या T20I कर्णधारपदी ऋतुराज गायकवाडला बसवायचे होते, पण...! इथूनच सुरू झाला BCCI सोबत राडा?

SCROLL FOR NEXT